छायाचित्र- ईलीयास बावानी
श्रीक्षेत्र माहूर : राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळून प्रत्येक जिल्ह्या सह नांदेड जिल्हा आणि माहूर तालुक्यात अॅग्रीस्टैंक संकल्पनेची अंमलबजावणी करावयाची असुन या संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांचा माहिती संच फार्मर रजिस्ट्री निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात दिनांक 08.03.2025 ते 13.03.2025 या कालावधीत ग्राम स्तरावर ऍग्री स्टॅक नोंदणी सप्ताह मोहीम स्वरुपात राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर मोहिमेच्या सनियंत्रण व समन्वयासाठी राजकुमार रणवीर उवि.कृ.अ. किनवट यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर आनंद देऊळगांवकर, तहसिलदार मुदखेड यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील सप्ताह माहूर तालुक्यातील प्रत्येक गावात राबविण्यात येणार असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने आपली नोंदणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
माहूर शहर तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी तांड्यात दि 08.03.2025 ते 13.03.2025 या कालावधीत अॅग्रीस्टॅक नोंदणी सप्ताह मोहीम स्वरुपात राबविण्यासाठी सोबतच्या विवरणपत्रानुसार संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, कृषी सहायक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. सोबतच्या सर्व नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांनी विवरणपत्रात नमुद दिनांकास सकाळी 8 वाजता गावात उपस्थित राहून शिबिराचे आयोजन करावे. या शिबिर प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभावशाली व्यक्ती, रास्तभाव दुकानदार, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, पोलिस पाटील, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी इत्यादीसह गावातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करावे जेणेकरुन योजनेची माहिती अधिकाधिक शेतक-यांना होईल. मोहिम कालावधीत शेतकरी यांना घरोघरी भेट देऊन त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक फॉर्मल आयडी तयार करणे व गावातील जास्तीत जास्त शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यावर भर द्यावा. या अनुषंगाने सी.एस.सी केंद्र चालकांच्या सहकार्याने गावपातळीवर शिविरामध्ये जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करण्यात यावी.
सदर आदेशास तात्काळ अंमल द्यावा व मोहिम कालावधीत करण्यात आलेल्या नोंदणीचा अहवाल व जीपीएस फोटोग्राफ्स तहसिल कार्यालयात शिबिर पुर्ण झालेनंतर तात्काळ सादर करावेत. मोहिम कालावधीत आयोजित शिबिरास जिल्हास्तरावरील वरीष्ठ अधिकारी तसेच नोडल अधिकारी भेटी देणार असुन सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी पूर्ण वेळ शिबिरास उपस्थित राहून जास्तीत जास्त शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार करुन घेण्याची कार्यवाही करणार असल्याने माहूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सप्ताह मध्ये आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.