मला माहित नाही मी कसा वाचलो..PM मोदींनी घेतली विमान अपघातातून वाचलेल्या रमेश यांची भेट..!
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 कोसळले, ज्यामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. परंतु या भयानक दुर्घटनेत, आशेचा आणि दिलासाचा किरण म्हणून एक नाव पुढे आले, ते म्हणजे रमेश विश्वास कुमार भारतीय वंशाचे 40 वर्षीय ब्रिटिश नागरिक विश्वास हे एअर इंडियाच्या विमान अपघातातून वाचल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 13 जून रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रमेश विश्वास कुमार यांची भेट घेतली आहे.
https://twitter.com/DDNewslive/status/1933395141009780874?t=33U6K59skch4TfQl7JitZQ&s=19
अपघातातून वाचलेले रमेश विश्वास कुमार काय म्हणाले?
डीडी (DDNews) न्यूजनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश विश्वास कुमार यांच्याशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान मोदींनी विचारले की हा अपघात कसा झाला. उत्तर देताना रमेश म्हणाले की, "मी विमानाच्या 11 A सीटवर बसलो होतो. मी कसा वाचलो हे मला माहित नाही. माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडले. मी कसे जगलो हे मला स्वत:लाही देखील माहिती नाही. क्षणभर मला वाटले की मीही मरणार आहे. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी जिवंत आहे. म्हणून मी प्रयत्न केला, मला वाटले की मी जगू शकेन, मी माझा सीट बेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो.
रमेश विश्वास कुमारांनी सांगितले ते बाहेर कसे पडले.?
रमेश विश्वास कुमार डीडी न्यूजशी बोलताना म्हणाले की, मी ज्या बाजूला बसलो होतो ती बाजू हॉस्टेलवर उतरली नाही. माझ्या विमानाचा भाग... खाली पडला होता. मला इतरांबद्दल माहिती नाही, मी ज्या बाजूला उतरलो होतो ती बाजू... खालची बाजू होती. माझा दरवाजा तुटताच मला दिसले की समोर काही रिकामी जागा आहे.म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि मी बाहेर पडलो. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. मला माहित नाही की मी कसे वाचलो.दोन एअर होस्टेस, एक काका-काकी आणि माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही जळत होते. मी तिथून बाहेर पडलो. आगीमुळे माझा डावा हात भाजला होता.