Amaravatinews |सामाजिक न्याय विभागाकडून चांभार समाजाच्या व्यक्तींना शंभर टक्के अनुदान..!
ऋषिकेश तायडे यांच्या पुढाकाराने अतिक्रमण मोहीम यशस्वी..!!
Amaravatinews | सामाजिक न्याय विभागाकडून चांभार समाजाच्या व्यक्तींना शंभर टक्के अनुदान तत्त्वाव गटाई स्टॉल देण्यात येतात.सदर स्टॉलचा उपयोग व्यक्तींनी चप्पल शिवण्याकरिता किंवा चप्पल विकण्याकरिता करण्यात यावे असे नमूद आहे.
परंतु बहुतांशी व्यक्ती सदर स्टॉल भाड्याने देतात किंवा विकून टाकतात अशा स्टॉलमध्ये अनेक व्यवसाय चालताना आपल्याला दिसतात तसेच चहा कॅन्टीन मटन शॉप, गॅरेज, इत्यादी आढळून येते.
समाज कल्याण तथा महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या गटाई स्टॉल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. परंतु त्यांनी सदर गटाई स्टॉल विकले आहे.
किंवा दुसऱ्या व्यक्तीस भाड्याने दिले आहे. अशा गटाई स्टॉल वर कार्यवाही करण्यात आलेली असून सदर स्टॉल जप्त करण्यात आलेले आहे. कारवाई ही कॉटन मार्केट रोडवर करण्यात आलेली असून कारवाई यामध्ये एकूण चार ट्रक साहित्य जप्त करण्यात आलेले आहे.
अमरावती मधील गटई स्टॉल धारकांना सुचित करण्यात येते की त्यांनी सदर स्टॉलचा वापर हा नियम नुसार करण्यात यावा व सदर स्टॉलमध्ये स्वतः व्यवसाय करावा. कोणीही स्टॉल भाड्याने देऊ नये किंवा विकू नये, सदर बाप शासनाच्या निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.. असे आवाहन समाज कल्याण विभाग आयुक्त अमरावती मार्फत करण्यात आले.