BSP|कार्यकर्त्यांनी बूथ सेक्टर बांधणी करावी- राजेंद्र कांबळे

 



BSP, Washim News





वाशिम सर्किट हाऊस येथे आज दिनांक 9 जून 2025 रोजी बहुजन समाज पार्टी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीला बसपाचे पश्चिम विदर्भ झोन प्रभारी राजेंद्रजी कांबळे यांनी मार्गदर्शन करतेवेळी .संघटन बूथ बांधणी लक्ष द्या असे पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुचवले. 

  यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल गवई यांनी प्रस्ताविक केले. बहन कुमारी मायावती जी यांचे हात बळकट करण्यासाठी एक नेता व निळा झेंडा आणि हत्ती निशाणी शिवाय अन्य पर्याय नाही यासाठी प्रत्येक घरात हा संदेश पोहोचवण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करा असे आवाहन केले आहे तसेच जिल्हा प्रभारी भाऊराव वासनिक यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संघनायक मोरे यांनी केले तर आभार जिल्हा प्रभारी प्रकाश आठवले यांनी केले.

    या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष रुपेश वानखेडे, जिल्हा महासचिव संतोष वाठोरे, मोहन खिराडे, उमेश जाधव, अश्विन वाघमारे, राहुल मैदकर, पवन कुमार कदम, विनोद सोनवणे, दीपक वानखडे, बबलू दादा वाहने, राहुल इंगळे, मनोज राऊत, प्रदीप मैंदकर, धीरज मैदकर, संतोष मैदकर, स्वप्निल मैदकर, विलास मैदकर, सुजात पाटील, रुस्तुम वानखडे, अनिल भगत, कैलास कांबळे, भारत सावळे, जगन्नाथ मैदकर, प्रजल मैदकर, संतोष शृंगारे, सुमेध राऊत, कमल राठोड, अभिषेक राऊत, इत्यादी कार्यकर्ते हजर होते तसेच अश्विन वाघमारे वाशिम शहराध्यक्ष व जगन्नाथ मैदकर यांना रिसोड विधानसभा संयोजक, विधानसभा अध्यक्षपदी उमेश जाधव यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र दिले व मनोज राऊत वाशिम तालुका संघटक पदी नियुक्तीपत्र दिले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व विधानसभा जिल्हा कमिटी आणि शहर कमिटी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post