नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह महिला तलाठ्यांची अर्ध्या रात्री नदीपात्रातील पाण्यातून जात धडक कारवाई

 

माहुर गावाकडची बातमी

             छायाचित्र ईलीयास बावानी माहूर


गोकुळ येथे अर्ध्या रात्री नदीपात्रात वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पकडले 


'तहसीलदाराच्या बदलीने रेतीचोर सक्रीय ; नांगी ठेचण्यास महसूल प्रशासनही सज्ज...

       

            विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

श्रीक्षेत्र माहूर :   माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांची बदली झाल्याचे कळताच तालुक्यातील वाळू तस्कर सक्रीय झाल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीत चंद्र दोंथुलां यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे आणि महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांचे सह तलाठी कर्मचाऱ्यांनी यांनी अर्ध्या रात्री जीवाची पर्वा न करता नदीपात्रातील पाण्यातून जात ट्रॅक्टर मध्ये वाळू भरत चोरी करुन ट्रॅक्टर पळूवूंन नेण्याच्या तयारीत असताना त्यास रंगेहात पकडून ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयात जमा केल्याचे धाडसी कारवाई दि 1 रोजी केली आहे.

काल दि. १ रोजी माहूर तालुक्यातील गोकुळ नगर येथे रेतीची चोरीच्या मार्गाने वाहतुक सुरू होणार असल्याची कुणकुण महसुल पथकाला लागली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूलां यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल, मंडळ अधिकारी शंकर चंदनकर, तलाठी अभिजीत कुडमते, तलाठी सी. पी. बाबर, तलाठी साहेबराव गावंडे, तलाठी ज्योति दुर्योधन मॅडम, कोतवाल सागर हिवाळे, दीपक लोखंडे, लक्ष्मण मेश्राम, विष्णू देवारे यांच्या पथकाने रात्रीच्या अंधारात काठीच्या साह्याने पाण्याचा अंदाज घेत नदीपलीकडून येत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले. अशाच कारवाया यापुढेही सुरूच राहतील असेही नायब तहसीलदार जेेठे यांनी सांगितले आहे.

नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे हे आधीच वाळू तस्करांच्या मुळावर उठलेले असल्याने त्यांनी तालुक्यात कुठेही वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यास तात्काळ वाळू गौण खनिज तस्करांच्या नांग्या ठेचून काढणार असल्याचे सांगितले दरम्यान पकडण्यात आलेले ट्रॅक्टर माहूरच्या तहसील कार्यालयात जमा केले असून महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांनी माझ्या आखंत्यारीत येत असलेल्या गावांमध्ये गौण खनिज तस्करी अजिबात खपवून घेणार नाही असे सांगितले..






Post a Comment

Previous Post Next Post