सात हजार घरकुलधारकांना 70 बरास वाळूचे वाटप

 


Mahurnews

            छायाचित्र ईलीयास बावानी माहूर


घरकुल लाभार्थ्यांचा दिवसभर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार कैलास जेठे यांना घेराव

 

 महसूल प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब मोफत वाळू वाटपाची मुदत संपली पाऊस पडल्यास वाळू कुठून आणणार घरकुलधारकांना पडलेला प्रश्न..

 


महसूल प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने हजारो घरकुलधारक उघड्यावर 


            विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यात शासनाकडून प्रत्येक खेड्यापाड्यात सात हजारावर घरकुल मंजूर करण्यात आले तर माहूर शहरातही हजारावर घरकुल बांधकामे चालू आहेत तसेच इतर बांधकामासाठी नागरिकांना हजारो ब्रास वाळूची गरज असताना महसूल प्रशासन शासनाचे आदेश पालन करणे ऐवजी 19 दिवसाची परवानगी असताना फक्त तीन दिवसात सात ते आठ हजार घरकुलधारकांना 70 ब्रास चिखल माती मिश्रित वाळू वाटप करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न करत असला तरी महसूल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो घरकुल धारकावर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे माहूरच्या महसूल अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी संतप्त घरकुलधारकातून होत आहे.

माहूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या शंभरावर गावासाठी साडेसात हजार घरकुल मंजूर करण्यात आले तर माहुरत जवळपास हजार घरकुलांची कामे सुरू आहे या सर्व घरकुलधारकांनी आतापर्यंत चोरीची वाळू घेऊन काम निभवले परंतु आता पावसाळ्या तोंडावर आल्याने नागरिकांना शासनाकडून मोफत पाच वाळूची अपेक्षा होती दि 20/ 5/2025 पासून ते 9 /6 /2025 पर्यंत मोफत वाळू नदी पात्रातून किंवा नाल्यातून घरकुलधारकांना तहसीलदारांनी उपलब्ध करून द्यावे असे आदेश असताना आज दि 9 रोजी शेवटचा दिवस असूनही घरकुलधारकांना ऑनलाइन वाळू पोहोचली नसल्याने फक्त सत्तर ब्रास वाळू देण्यात आली तर ऑफलाइन पावत्या तयार असूनही एकाही घरकुलधारकांना देण्यात आली नसल्याने माती मिश्रित पाच हजार रुपये बरासने वाळू विकत घ्यावी लागली असून तेही तीन बाराची पावती ऑनलाइन तयार होत असताना फक्त एकच बराच देऊन बोलवण करण्यात आल्याने संतप्त घरकुलधारकांनी तहसीलमध्ये येऊन नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांना घेराव घातला होता.

तत्कालीन तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पडसा येथून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी नदी पात्रातून रस्ता बनवण्यास सांगितले होते याच रस्त्यावरून मौजे पडसा येथील नागरिकांना सत्तर ब्रास वाळू मोफत देण्यात आली होती त्यांची बदली झाल्याने नवीन तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी पण दूरध्वनीवरून रस्ता तयार करा आपण वाळू वाटप सुरू करू असे सांगितल्याने वाळू व्यवसायिकांनी रस्ता तयार करत असतानाच सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांनी अचानकपणे धाड टाकून टू टेन हायवा जे सी बी जप्त करून इमानदारीने काम करणाऱ्या वाळू व्यवसायिकाला चोर ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.

   त्यामुळे घरकुलधारकांना मिळनाऱ्या मोफत वाळू ची आशा धुसर झाली असताना चोले पेंड येथून फक्त चाळीस ब्रास वाळू माती मिश्रित मोठ्या दगडांनी माखलेली वाळू नागरिकांच्या माथी मारन्यात आली तसेच चोले चोले पेंडवर वाळू वाहतूक करणाऱ्यांनी लाभार्थ्यासोबत प्रचंड मनमानी करत गाळयुक्त वाळू दिली तर अनेकांची तीन ब्रासची पावती निघालेली असताना फक्त एकच ब्रास देऊन दमदाटी करून हाकलून देण्यात आले. यामुळे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यात भयंकर नाराजी पसरली असून आता वाळू वाटपाची तारीख संपल्याने उरलेल्या हजारो लाभार्थ्यांना वाळू कोठून देणार हा प्रश्न उभा ठाकला आहे चोले पेंड काळे पेंड आणि टाकळी येथून रात्रीला प्रचंड प्रमाणात चोरी होणारी वाळू रोखण्याचे आणि हजारो लाभार्थ्यांन ऑफलाइन पावत्या देऊन वाळू पुरविण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला तहसीलदार मुंगाजी काकडे नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांचे समोर असून जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून मुदतीत वाळू वाटप न करवाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून लाभार्थ्यांना मोफत वाळू घरपोच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post