शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी टाॅप कोण..? 32 कसोटी सामन्यांनंतर कुणाचा रेकॉर्ड चांगला,जाणून घ्या...

 

Cricket

      Gavakadachi news network 


इंग्लड दौऱ्यासाठी शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार याची स्पर्धा आता संपली आहे. कारण शुभमन गिलवर कमान सोपवण्यात आल्याने तो आता भारताचा कर्णधार म्हणून इंग्लडमध्ये विजयी पताका फडकावण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडमध्ये स्पर्धेदरम्यान कर्णधारपद भूषवणे सोपे काम असणार नाही. गिलसोबत ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, त्यामुळे आता दोघांचा अनुभव पणाला लागणार आहे. शुभमन गिल भारताचा आक्रमक आणि तितकाच शांतपणे खेळणारा तरुण फलंदाज आहे पण टी-ट्वेंटीच्या तुलनेत त्याचा कसोटीचा अनुभव मोठा नाही. त्याने जास्त सामने खेळलेले नाहीत. ऋषभ पंतने त्याच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यामुळे दोघांमध्ये फलंदाजीमध्ये तुलना केली जात आहे. ऋषभ पंत की शुभमन गिल यांच्यापैकी सरस कोण हा प्रश्न आता विचारला जात आहे.

शुभमन गिल पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार

खास गोष्ट म्हणजे क्रीडा रसिकांना खेळाडूतील तुलना आवडते, कोण कोणापेक्षा जास्त सरस हे जाणून घ्यायला आवडते. त्यामुळे आज आम्ही शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या टेस्ट क्रिकेट रेकाॅर्ड,धावांबद्दल माहिती देणार आहोत. शुभमन गिल पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहे, पंत त्याला मदत करण्यासाठी तिथे असेल. गिलने आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. या दोघांच्या ३२ कसोटी सामन्यांची तुलना करून, तोपर्यंत कोण पुढे होते आणि कोणाचा वरचष्मा होता हे उघड आहे.

शुभमन गिलचा रेकार्ड काय..

शुभमन गिलने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ३२ कसोटी सामन्यांच्या ५९ डावांमध्ये एकूण १८९३ धावा केल्या आहेत.

या दरम्यान, त्याच्या बॅटने ७ अर्धशतके आणि ५ शतके झळकावण्यात यश मिळवले.

गिल या काळात पाच वेळा नाबाद राहिला आहे आणि त्याची एकूण सरासरी ३५ आहे.

शुभमन गिलची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या १२८ धावा आहे.


ऋषभ पंतचा रेकार्ड काय.

विक्रमानुसार ऋषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत गिलपेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

परंतु पहिल्या ३२ कसोटी सामन्यांचे त्याचे आकडे येथे पाहिले आहेत. ऋषभने एकूण ५४ डाव खेळले आहेत, ज्यामध्ये तो ५ वेळा नाबाद राहिला आहे.

ऋषभने २,१६९ धावा आल्या आहेत. या दरम्यान पंतने ११ शतक लगावले आणि ११ अर्धशतकेही ठोकली आहेत.

ऋषभची सरासरी ४४ पेक्षा जास्त आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १५९ धावा नाबाद आहे.


Post a Comment

Previous Post Next Post