Blood donation | सागर ॲग्रोटेकचा स्तुत्य उपक्रम: 35 जणाचे कंपनी स्थळी रक्तदान



Blood donation, सागर ॲग्रोटेक


उमरगा:-  येथील महाराष्ट्र औद्योगीक परिक्षेत्रातील सागर ॲग्रोटेक कंपनीच्यावतीने  दि. 8 जुन रोजी कामगारा करीता तसेच परिसरातील जनतेकरीता रक्तदान शिबीसचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबीरात 35  जणा पेक्षा जास्त जणांनी रक्तदान केले.विशेष म्हणजे कंपनीचे मालक गोविंद भाई पटेल यांच्यासह संपूर्ण परीवाराने रक्तदान केले. औद्योगिक परिसरात असा स्तुत्य  उपक्रम घेणारी एकमेव कंपनी आहे.

     जकेकुर औद्योगिक परीसरात सागर ॲग्रोटेक कंपनी असून यांच्यामार्फत मागील तीन वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असून, या शिबीरात स्वइच्छेने साधारण 35 जणानी रक्तदान केले. विशेष म्हणजे कंपनीचे मालक गोविंद भाई पटेल यांनी आज 36 वे रक्तदान केले त्यांच्या पत्नी मंजुलाबहेन पटेल यांनी 34 वे ,मुलगा किशन पटेल यांनी 11 वे रक्तदान केले. तसेच त्यांच्या परीवारातील इतर 5 सदस्यांनी रक्तदान केले .रक्तदान हे महादान असून, यामुळे एखाद्याला जीवनदान प्राप्त होत असल्यास रक्तदान करण्यात काही हरकत नाही.या भावनेतून गोविंद भाई पटेल यांच्यासह त्यांच्या गुजराती परीवाराच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते .

  हे शिबीर यशस्वी करण्याकरीता राकेश पटेल, विष्णू माने,सचिन दोडतले,मतीन खान, रोहीत रेड्डी, अनिस,राहील पटेल, यांनी परिश्रम घेतले, श्रीकृष्ण रक्त केंद्र यांचे विजय केवडकर, राहुल कांबळे, रुतीक मात्रे, कृष्णा काळे, योगेश सोनकांबळे यांचा या शिबीरात सहभाग होता. या शिबीराकरीता प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथून आरती शुभम पटेल, शुभम दामोदर पटेल, जिनल दामोदर पटेल यांची विशेष उपस्थिती होती. सागर ॲग्रोटेक च्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण करून औद्योगिक परीसरातील इतर कंपन्यानी ही कामगारांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवावे अशी या क्षणी गोविंद भाई पटेल यांनी आपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post