छ.संभाजी नगर : काळीज माझ काव्य स्नेह संमेलन सोहोळा नाशिक येथे 8 जून 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात भिमशाहिर उतमराव म्हस्के यांना जिवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे. गूलाब राजा फूलमाळी संयोजिका सूरेखा बेंद्रे यांच्या हस्ते पूरस्कार प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम पार्क साइड बंक्विट हाॅल नाशिक येथे संपन्न झाला. भिमशाहिर उतमराव म्हस्के हे गेल्या 40 ते 45 वर्षा पासून महाकवी वामनदादा कर्डक यांची जूण्यातील जूनी गाणी गावून आणि आपली स्वरचीत गाणी गावून समाज प्रबोध करीत आहे. तसेच ते महाकवी वामनदादा कर्डक यांचे जेष्ठ शिष्य पण आहे. उतमराव म्हस्के यांच्या आज पर्यंत साप्ताहिक. दैनिक. दिवाळी अंक.आकाशवाणी छ.संभाजी नगर मधून कथा. काव्य वाचन आणि दोन नभो नाट्य प्रसारी झालेले आहे.
शाहिर उतमराव म्हस्के यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल सूमीत पगारे,संगितकूमार गोखले,अनिल वानखेडे,राहूल गाडेकर,शाहिर भालेराव,मधूकर दिवेकर,संभाजी गायकवाड,अशोक जाधव,शोभा कुलकर्णी, शालिनी भालेराव,वैशाली गोखले.उज्वला पगारे. इत्यादीने अभिनंदन केले.