एसबीआय ७० व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 

SBIBank



सर्व नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेण्याचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांचे आवाहन

             विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

श्रीक्षेत्र माहूर  : भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त माहूर शाखेत दि 13 6 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने सर्व ग्राहक आणि शहरवासीयासह तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन माहूर एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांनी केले आहे.

भारतीय स्टेट बँक देशभरात स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम राबवित असते त्या अंतर्गत यावर्षी माहूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असून सर्व ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच सर्व नागरिकांनी या शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून रक्तदान करणाऱ्यांना दोन प्रकारच्या भेटवस्तू आणि प्रशंसा पत्र देण्यात येणार असल्याचे माहूरचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांनी सांगितले.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करणाऱ्यांना कुठलाही त्रास जाणवनार नसल्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून एसबीआयच्या सर्वच ग्राहकांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरात भाग घेऊन एसबीआय बँकेचा 70 वा स्थापना दिवस सर्वश्रेष्ठ दान करून साजरा करावा असे आवाहनही करण्यात आले असून शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार हे रक्तदान शिबिर यशस्वी व्हावे म्हणून बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यासह परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post