विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
Achalpurnews : गौरखेडा कुंभी तालुका अचलपूर येथे मुसळधार पावसामुळे खुप नुकसान झाले आहे गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत हद्दीतील कुंभी गावातील प्रशांत दरेकर यांच्या कडे घरकुलाचे बांधकाम चालू असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने त्यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले आहे घरातील सर्व वस्तू फ्रिज, पंखा, टीव्ही,कुलर व इतर खाण्यापिण्याच्या धान्यांचे सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच इतरही नागरिकांच्या घरावरील टीनपत्र्याचे छप्पर सोसाट्याच्या वार्यामुळे उडुन गेले आहेत शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून त्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.
