" सम्राट डोंरगरदिवे " कबड्डी चषकचा प्रथम मानकरी ठरला संभाजीनगरचा साई सेवा क्रिडा मंडळ संघ



अकोला जिल्हा कबड्डी सम्राट दाळू गुरुजी व नाजुकराव पखाले यांची उपस्थिती



विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मुर्तिजापूर - येथील माई सोशल बहुउद्देशीय संस्था द्वारे आयोजित अखिल भारतीय सम्राट डोंगरदिवे कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन श्री संत गाडगे बाबा विद्यालय, मेन रोड मुर्तिजापूर च्या प्रांगणात करण्यात आले होते या स्पर्धे करिता भारतातून २० संघ सहभागी झाले होते.

    सदर कबड्डीचे सामने हे विदर्भ व अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते प्रथम पारितोषिक १ लाख रु सम्राट जयरामजी डोंगरदिवे (सभापती जि प अकोला) यांच्या कडून व दुसरे पारितोषिक ७० हजार रु सम्राट जयरामजी डोंगरदिवे ,तृतीय पारितोषिक ३० हजार रु राजू भाऊ सदार व चतुर्थ पारितोषिक २०हजार रु श्याम भाऊ येवले यांच्या कडून दिल्या गेले.




१२ मे ला सायंकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, आमदार अमोल मिटकरी, सम्राट डोंगरदिवे, श्याम येवले, राजू सदार, इम्रान शेख नगरसेवक, उपस्थित होते सामने हे रात्रीच्या फ्लड लाईट मधे आयोजित केले होते या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना संभाजीनगर विरुद्ध यु.पी. योध्दा यांच्या मध्ये अतिशय चुरशीचा झाला त्या सामन्यात संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले प्रथम साई सेवा क्रीडा मंडळ संभाजीनगर १ लाख रु ,दुसरे पारितोषिक ७० हजार रु यु. पि. योद्धा,तिसरे पारितोषिक ३०हजार रु हरियाणा अकादमी हरियाना व चतुर्थ पारितोषिक २० हजार रु समर्थ क्रीडा मंडळ अमरावती या संघाने पटकावले उत्कृष्ट रेडर यु. पी. संघाच्या खेडाळुला संदीप सरनाईक माजी नगरसेवक यांच्या तर्फे सायकल देण्यात आली सदर खेडळूच्या जेवणाची व्यवस्था नानकरामजी नेभनानी यांनी केली होती. बक्षीस वितरणाला कबड्डीचे अकोला जिल्हा सम्राट दाळू गुरूजी, नाजुकराव पखाले, अकोला जिल्हा कबड्डी असो चे सचिव नेरकर गुरूजी प्रभाकर रुमाले, संजय मैंद,यांची उपस्थिती होती.स्पर्धा आयोजित करण्यासाठी शेखर येदवर, दिवाकर काटे, संतोष चौधरी, स्वप्नील जामनिक , जावेद खान, श्याम येवले, सतीश शेद्रे, राहुल आष्टीकर, राहुल इंगोले, गणेश पाढेन, भरत वानखेडे, पिंटू वानखेडे, पप्पू मिर्झा, आकाश चिकने, मयुर राठोड, हर्षल यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती आयोजक शेखर येदवर (माई सोशल बहुउद्देशीय संस्था) व समजसेवक सम्राट जयरामजी डोंगरदिवे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post