अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत रेपाटखेड ते उद्बोधन कार्यक्रम संपन्न

 




विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 



मूर्तिजापूर - तालुक्यातील रेपाटखेड येथे अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत उद्बोधन कार्यक्रम संपन्न 

   गावातील युवकांना युवा संस्थेविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर युवकांसाठी अनुभव शिक्षा केंद्र हे एक खुले व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून युवक आपला विकास करू शकतो त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षता ,लोकशाही स्त्री पुरुष समानता,पर्यावरण सुरक्षा सामाजिक न्याय, श्रम प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा ही मूल्य युवकांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केला जातो त्याच बरोबर YLBC (युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स)बद्दल युवकांना माहिती देण्यात आली. युवा विकास आणि विकाससाठी युवा याविषयी युवकांना अनुभव शिक्षा केंद्र अमरावती व वाशिम जिल्हा प्रशिक्षक कु.रिंकू अनिल भटकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उद्बोधन कार्यक्रमाला गावातील अमर जामनिक, संदीप जमनीक , अभय जामनिक,सुमित हिवराळे, यश जामनिक, प्रणव जामनिक, राजेश बयस्ट,जय जामनीक, सुरज जामनिक, दर्शन जामनिक, ऋत्विक जामनिक, प्रशांत नाकट, अमर दामले इ. युवक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post