मूर्तिजापूरात छत्रपति संभाजी महाराज जयंती निमित्त दिंडी स्पर्धा उत्साहात

 



टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमले होते मूर्तिजापूर शहर




विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर - छत्रपति संभाजी महाराज जयंती निमित्त तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेयर सोसायटी तथा मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा व भव्य दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

    या दिंडी स्पर्धे मध्ये विविध गावातील अनेक दींड्या सहभागी झाल्या होत्या. सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरुवात करण्यात आली तर दुपारी भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.





     सायंकाळी दिंडी स्पर्धा स्थानिक कारंजा टी पॉइंट येथुन सुरू होउन, भगतसिंग चौका मार्गे छत्रपति शिवाजी महराज चौक येथे स्पर्धेचा समारोप झाला. या शोभायात्रेत कारंजा येथिल शिवप्रताप ढोल पथक व मूर्तिजापुर येथील शिवजातस्य ढोल पथक प्रमुख आकर्षण ठरले. दिंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गजानन महाराज हरिपाठ मंडळ बेंबळा, द्वितीय क्रमांक गजानन महाराज सेवा समिती शिवर तर तिसरा क्रमांक श्रीराम हरिपाठ मंडळ बेंबळा यांनी पटकावला तर प्रत्येक सहभागी दिंडिस टोपी, दुपट्टा, नारळ, मानधन व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अकोला जिल्हा अध्यक्ष अशोक पटोकर तर उद्घाटक म्हणून तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेयर सोसायटी चे अध्यक्ष तथा उद्योजक सुगत वाघमारे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिति म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे, मराठा सेवा संघ मूर्तिजापुर तालुका अध्यक्ष गजानन बोर्डे, मराठा सेवा संघाचे प्रा. प्रमोद ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा सेवा संघ अशोक मोरे, संभाजी ब्रिगेड चे विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता, संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हाध्यक्ष शंतनू हिंगने, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष उज्वल ठाकरे, संभाजी ब्रिगेड अकोट चे जीवन गावंडे, शहर अध्यक्ष हितेश ठाकरे, सुपर्ब ग्रुप चे सी ई ओ तिक्ष्णगत वाघमारे, शिवदास महाराज आलंदीकर, रामेश्वर महाराज, गोपाल महाराज, कृष्ना महाराज, पोलकट महाराज, वहिले साहेब, डॉ कौलखेड़े जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष सविता भटकर, प्रा. मनीषा यादव, भूषण कोकाटे, श्रीकृष्ण बोले, कमलाकर गावंडे, अप्पू तिडके, सचिन देशमुख, राम कोरड़े, डॉ भूषण बोर्डे, प्रवीण नागपुरे, पंकज कांबे, गजानन नाकट, संदीप जलमकर उपस्थित होते.

कार्यक्रमा करीता पवन तळोकार, वैभव वानखडे,प्रज्वल ठाकरे, प्रविण नवले, हर्षल जाधव, आकाश गायकवाड, पंकज नवले, अजय नवले, विजय नवले,निखिल किर्दक,उज्वल नवले, श्वेता चक्रणारायन, पुष्पक डोंगरे, विष्णू मोंडोकार ,श्रीकांत पिंजरकार, अमित खांडेकर,विशाल शिंदे, मिलिंद इंगळे,अनिल डाहेलकर,क्रिष्णा घ्यारे,बॉबी पळसपगार, तीक्ष्णगत मल्टी पर्पज वेल्फेयर सोसायटी, संभाजी ब्रिगेड तथा मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा डोंगरे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post