१ जुन संत गजानन नगरी शेगाव येथे चांदुर रेल्वे तालुक्यातून शेकडोंनी नागरीक होणार सहभागी




अमरावती, चांदूररेल्वे : विदर्भ राज्य आंदोलन समितिची चांदुर रेल्वे तालुका बैठक दिनांक 19 मे रोजी विभागीय अध्यक्ष अशोकराव हांडे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान एड. मनोहरराव देशमुख यांनी भूषविले. १ जून शेगावला होणाऱ्या गजाननाला साकडे व विदर्भ आक्रोश मिळाव्यात जास्तीत जास्त संख्येने जनता सहभागी करण्याविषयी विचार विनिमय करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर ,तालुका उपाध्यक्ष नंदूभाऊ देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष दिनकर निस्ताने ,अमरावती कोर कमिटी सदस्य शंकरराव वाघाळे यांनी मार्गदर्शन केले .तसेच गावोगावी पत्रके वाटून सर्वसामान्य जनतेला या मेळाव्यात येण्याचे आव्हान करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. 

अमरावतीच्या कोअर कमिटी मध्ये नियुक्ती करण्यात आल्या त्यानुसार जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव निस्ताने, विभागीय अध्यक्ष अशोकराव हांडे, अमरावती जिल्हा कोर कमिटी सदस्य डॉ. शंकरराव वाघाये यांचा पुष्पगुच्छ देऊन या बैठकीत सत्कार करण्यात आला .प्रा.प्रभाकर कोंडबत्तचनवार लिखित "उजड़े गावों का अशांत प्रदेश विदर्भ "पुस्तिकेचे वितरण संपूर्ण मार्केटमध्ये प्रत्तेक दुकानात करण्यात आले. तसेच चलो शेगाव संबंधी पत्रके वाटून मिळाव्यात येण्याचे आवाहन करण्यात आले. आपले राज्य विदर्भ राज्य लिहलेली बनियान घालून सर्वांनी प्रत्येक दुकानांमध्ये पुस्तके व पत्रके देऊन त्याचा शेवट गाडगेबाबा मार्केट मध्ये करण्यात आला. पुस्तके वितरित करताना राजेंद्र आगरकर ,अशोकराव हांडे ,नंदकुमार देशमुख ,विजय देशमुख एडवोकेट मनोहर देशमुख ,बाबाराव जाधव ,डॉ.शंकरराव वाघाये ,दिनकरराव निस्ताने, मुकुंद तिरतकर ,शिवाजीराव चौधरी , डॉ. सुरेंद्र खेरडे,शेळकेताई,एशाखुभाई सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post