आयुध निर्माण चांदा भद्रावती बुध्द विहार येथे सुरेश मल्हारी पाईकराव यांची सदिच्छा भेट

 




Goodwill visit by Suresh Malhari Paikarao at Ayudh Nirman Chanda Bhadravati Buddha Vihar



चंद्रपूर,सुविद्या बांबोडे :  आज रोजी भारतीय बौद्ध महसभा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर कविताताई चांदेकर केंद्र शिक्षिका भारतीय बौद्ध महसभा चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली चालु असलेले बाल धम्म संस्कार शिबीराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या शिबिराचे उद्देश लहान लहान मुलांना आपल्या धम्माचे ज्ञान मिळाले पाहिजे आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे या उद्देशाने बाल धम्म संस्कार शिबीर आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरा मध्ये शेकडो लहान मुलांनी भाग घेतला असुन लहान मुलांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस यांनी आयुध निर्माण चांदा भद्रावती बुध्द विहाराला सदिच्छा भेट देऊन कविताताई चांदेकर  यांना धन्यवाद व अभिनंदन केले कि त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून लहान लहान मुलांना धम्माचे ज्ञान व त्यांच्यावर धम्माचे संस्कार झाले पाहिजे आणि बौद्ध धम्माचे ज्ञान घरोघरी पोहोचविले पाहिजे अशी शुभेच्छा यावेळी सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिले.

 मालतीताई पाटील अध्यक्षा भारतीय बौद्ध महसभा भद्रावती

शहर शाखेचे अध्यक्षा मिलीताई वाघ ,कविताताई जांभुळकर  . मिना बांबोळे  आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post