खालखोनी सामदा काशिपुर ते श्री क्षेत्र पंढरपुर
खोलापुर , विशेष प्रतिनिधी नवल मानकर : दिंडी प्रस्थान आरंभ- गुरुवार दि- २५ /५ /२०२३ ते गुरुवार दि- २२ /६/२०२३ ला (पंढरपूर प्रवेश) *सांगता-* आषाढ शु. पौर्णिमा सोमवार दि- ३/७/२०२३
दरवर्षी प्रमाणे पायी दिंडी सोहळा ब्र.ऋषीसंत घुसरकर महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने तथा मठाधिपती ऋषीवर्य ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या प्रेरणेने व गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज इंगळे व श्री.ह.भ.प. विष्णूपंत कुपटे महाराज यांच्या आशिर्वादाने महाक्षेत्र पंढरपुर आषाढी पायी पालखी सोहळा करिता निघत आहे.
या पालखी सोहळ्या मध्ये असंख्य महीला व पुरुष मंडळी सामिल होणार असुन
दररोज सकाळी काकडा भजन, दुपारला ज्ञानेश्वरी प्रवचण सायंकाळी हरिपाठ व रात्री वाटचालीचे हरि किर्तन होणार आहे. पायी वाट- चालीचा मार्ग खालखोनी-आसरा- कळमगव्हाण, दर्यापूर व रात्रीला मुक्काम- सुर्यवंशी वाल्मिकी मठ संस्थान सामदा काशिपुर व दुसऱ्या दिवशी नांदरुण, लोतवाडा, अंबिकापुर, आपोती खुर्द. घुसर, मोठी उमरी अकोला. चतुर्भुज काॅलणी, कौलखेडा अकोला, खडकी, कापसी रोड कडे रवाना होणार आहे.
श्री तिर्थक्षेत्र पंढरपुर येथे अन्नदानाचे महत्व व फल सांगतांना श्री.संत नामदेव महाराज म्हणतात.
तेथे एक शीत दिधल्या अन्न/
कोटी कुळाचे होय उद्धरण/
कोटी याग केले पुर्ण/
ऐसे महिमान ये तिर्थाचे//
अन्नदान करणाऱ्या मंडळींची नावे- प्रा. डिगांबर कावरे खालखोनी, ची. कृष्णा दादाराव तरोळे गरसोळी, . धनंजय रामरावजी मोहोड सराफ साथ अमरावती, .संतोष नारायण बुध वडाळा. .आशाबाई नाजुकराव धांडे, उषाबाई संतोषराव गवार, संगीताताई समाधान पुनकर अमरावती, अशोकराव ग्यानदेवराव टपके आष्टी,ची. रोहित पुरुषोत्तम काळे(नांदरुण) अमरावती, . किसनराव रामदासजी वडाळ चौहोटा बाजार, रमेश भटकर शिंगणापूर , शांता प्रकाशराव राणे रामागड, अंबादास रामभाऊ सखे धामोरी, विठ्ठलराव तरोळे अमरावती, वसंतराव भिवाजी कड सावरगाव बरडे, . मनोहरराव रंगरावजी सातव खारतळेगाव, लक्ष्मणराव हनुमंतराव राणे भुरस रामागड, काशिनाथ पांडुरंग ढगे दर्यापूर, सुनंदाबाई रमेशपंत शिंदे परतवाडा, भास्कराव भिमरावजी पाघृत खरप,. प्राध्यापक नानासाहेब कुटेमाटे खामगाव, गणेश शंकरराव रायबोले जामगाव बार्शी, तुषार अशोक फड धर्मापुरी, राजुभाऊ नाजुकरावजी वानखडे वडाळा. प्रा. एकनाथराव रामेश्वरजी रौराळे सरमसपुर. अविनाश नरोकार कावसा, . महादेव कृष्णाजी भांडे खारतळेगाव, डॉ. प्रमोद बाबारावजी भटकर खालखोनी, रजणीबाई रामकृष्ण भोपसे अमरावती, श्री. दिनेशभाऊ युवराजजी डवले आष्टी, . लक्ष्मीबाई नारायणराव रामाघरे कुमागड. सविताबाई संजय राणे वडाळा, गोपाल रमेशभाऊ ठाकरे वडाळा, . कुंदलताबाई कैलासराव देशमुख बोर्डी, किशोर मलिये दर्यापूर, सुरेश रौराळे, .पांडुरंग रौराळे सरमसपुर
श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि:- २३ जुन ते ३० जुन २०२३ पर्यंत सकाळी दररोज ९ ते १२ वाजे पर्यंत भागवत कथा आयोजित केली आहे. भागवत प्रवक्ते:-.ह.भ.प. शरदजी महाराज पाटील आळंदिकर यांच्या मुखारविंदाव्दारे श्रवण करायला मिळणार आहे. सौजन्य:-. अशोकराव ग्यानदेवराव टपके आष्टी
पालखीचे मुक्काम चंद्र भागेतीरी दिनदयाळ महादेव मंदिर सामान्य रुग्णालयात (कॅरेज हाॅस्पिटल जवळ रामबाग) तीसरा माळा पंढरपूर येथे असुन
ज्या भाविक भक्तांना पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी व्यवस्थापक मंडळी कडे नावाची नोंदणी करुन घ्यावी. अशी माहिती श्री.महर्षी वाल्मिकी पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्ट खालखोनी येथील दिंडी संचालक श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिली आहे.
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या तुमच्या जिल्ह्यातील प्रतिनिधीशी संपर्क साधा..
मुख्य संपादक देवेंद्र भोंडे
संपादक लक्ष्मण राजुरकर
कार्यकारी संपादक एस कृष्णा रौराळे
मार्गदर्शक कैलास बनसोड