प्रतिनिधी, शशांक चौधरी -
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावामधील पक्षी प्रेमी व समाज सेविका "संगीता प्रदीप पवार" यांनी पक्ष्यांना चारा - पाणी उपलब्ध करून दिले.
या रख - रखत्या उन्हामुळे लोकांचेच घराच्या बाहेर जाणे मुश्किल आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळं तलाव, नद्या, नद्या, ओढे यांची पाण्याची पातळी कमी होऊन जाते. तहान प्रत्येक जीवाला लागते त्यात भटके जीव सुध्दा पाण्याच्या शोधात दूर पर्यंत भटकत असतात, किंवा पाणी ज्या क्षेत्रात असत त्या ठिकाणावर पक्षी स्थलांतर करतात. ही बाब यांच्या लक्षात येताच 'संगीता प्रदीप पवार' यांनी अक्षरशः आपल्या घराच्या वरच्या भागात या मुक्या जिवांसाठी एक '५०० चौ. फूट' जागेवर छोटे या पक्ष्यांसाठी जंगल स्वरूपाचे विश्रांती गृहाचे निर्माण केले. ज्या मध्ये पक्ष्यांसाठी पाणी, चारा, झाडे लावून त्यांना क्षण भर विसावा उपलब्ध करून देण्यात आले. विशेष म्हणजे ही बाब पक्षांना दिसताच मोठ्या संख्येने पक्षी तिथे येत असतात.
त्या नेहमी आपल्या सभोवतालच्या परिसरातील विविध समस्यांवर काम करण्यास तत्पर असतात.
संगीता प्रदीप पवार या "उपजीविका" समुदाय संसाधन व्यक्ती (आयसीआरपी) म्हणून कुऱ्हा, पंचायत समिती तिवसा येथे कार्यरत आहेत. त्यांना मुक्या जीवांची सेवा करण्यात व सामाजिक कार्य करण्यात वेगळा आनंद प्राप्त होतो असे त्यांनी आमचे तालुका प्रतिनिधी शशांक चौधरी यांनी त्या जागेवर भेट दिली असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या नेहमी आपल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे एक चांगले उदाहरण निर्माण करतात.
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या तुमच्या जिल्ह्यातील प्रतिनिधीशी संपर्क साधा..
मुख्य संपादक देवेंद्र भोंडे
संपादक लक्ष्मण राजुरकर
कार्यकारी संपादक एस कृष्णा रौराळे
मार्गदर्शक कैलास बनसोड