सिरपुर ग्रा प मधील प्रकार,गावकऱ्यांनी एकमतांनी विधवा महिलेची केली निवड
चंद्रपूर /चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या सिरपुर येथे आशाताई ची जागा निघाली असता अनेक महिलांनी त्या जागेसाठी आवेदन केले यात अनेक श्रीमंत महिलांनी आपआपल्यापरीने जोर लावला त्यामुळे गावात याबद्दल चर्चा झाली तेव्हा गावकऱ्यांनी आशाताई ची निवड जनतेच्या मतातून घेण्याचे ठरविले गरीब निराधार महिलेला ही जागा मिळावी यासाठी गावकऱ्यांनी दि 19 मेला ग्रामसभेचा आयोजन करून एकमताने एका विधवा असहाय्य महिलेची आशाताई म्हणून नीता प्रभाकर डाहारे नामक महिलेची निवड केली यामुळे सर्वत्र प्रकारचे कौतुक होत असून गावकऱ्यांचे अभिनंदन होत आहे
या परिसरातील ग्रामीण भागातील सिरपुर हे मोठे गाव असून रुग्णांच्या सेवेसाठी, गावकऱ्यांच्या मदतीसाठी आशाताईंनी जागा निर्माण झाली. जागा उपलब्ध होताच अनेक महिलांनी या जागेसाठी आवेदन केले यामध्ये 14 महिलांनी आवेदन केले होते.
आशाताई साठी नंबर लागावा यासाठी वरतीपर्यंत बोलणी केल्याची चर्चा गावात सुरू झाली अनेक महिलांनी साठेंगाठे केल्याची माहिती सुद्धा गावकऱ्यां कळले तेव्हा गावकऱ्यांनी सदर जागेसाठी पात्र उमेदवार महिलेला ग्रामसभेच्या माध्यमातून निवड करून पाठवण्याचा निर्धार केला.
कारण यामध्ये गावातील गरीब व निराधार महिलेला संधी मिळावी आणि तिच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे तिला करता यावे यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली.
यावेळी गावातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी व गावकर्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली यामध्ये गावातील विकास कामे आणि इतर विषय सुद्धा घेण्यात आले यानंतर आशाताई निवडीचा विषय घेण्यात आला गावातील नागरिकांनी एकमताने निराधार विधवा महिलेची आशाताई पदासाठी निवड करून संबंधित विभागाला कळविण्यात आले. असून लवकरच आशाताई म्हणून त्या रुजू होतील निवड झालेल्या लता प्रभाकर डहारे या महिलेचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या आगळ्यावेगळ्या निवड प्रक्रियेमुळे सर्वत्र कौतुक होत असून गावकऱ्यांचे अभिनंदन होत आहे..