घरकुल लाभार्थ्याचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
विशेष प्रतिनिधी/ संतोष भालेराव
अंजनगाव पंचायत समिती मधील ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांना पहिला चेक मिळाल्यानंतर दुसऱ्या चेक साठी विनाकारण त्रास अडवणूक करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पूर्वी घरकुलाचे काम होण्यासाठी व चेक का अडवल्या गेले याचा जाब विचारण्यासाठी ग्रामीण भागातील घरकुल गरीब लाभार्थी पंचायत समिती अंजनगाव समितीमध्ये कार्यालयात सर्व घरकुलाचे काम करणारे कर्मचारी अधिकारी यांना बोलावून सर्व लाभार्थ्यांना सर्व विना विलंब त्वरित चेक वितरित करण्याचे मागण्या केल्या गेल्या व काही तांत्रिक अडचणीमुळे रोजगाराचे मजुरीचे पैसे मिळत नसल्यामुळे तेही पण काम लवकरात लवकर करून देण्याचे खताळे बिडीओ यांनी हमी दिली याच दरम्यान दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी दूरध्वनीवरून घरकुलाच्या लाभार्थ्यांना कोणता त्रास होणार नाही व घरकुलासाठी पाच ब्रास रेती मिळून देण्यासंबंधी दर्यापूर पंचायत समिती प्रमाणे अंजनगाव पंचायत समितीमधील लाभार्थ्यांना पण याचा फायदा मिळावा. यासाठी तहसील प्रशासनाशी संपर्क करून रेती उपलब्ध करून देण्यासाठी सांगितले निवेदन देतांना माजी उपसभापती महेश पाटील खारोडे प्रतीक मळसणे ग्रामपंचायत सदस्य कापूस तळणी संतोष गावंडे ग्रामपंचायत सदस्य विगाव ते युवा समाजसेवक तेजस अभ्यंकर रमेश सावळे तुरखेडचे सरपंच कृषी गायगोले प्रदीप पाटील दालू सचिन लांडे दिनेश अगडते उपसरपंच हिंगणी विनायक इंगळे विजु धुमाळे दहिगाव साहेबराव सावेकर सुनील सीताफळे मालू मरकाळे साहेबराव पाटील हगवणे व पत्रकार बंधू उपस्थित होते तालुकेतील गरजवंत लाभार्थी उपस्थित होते. तालुक्यातील गरीब अपंग विधवा लाभार्थी घरकुलाचा चेक पावसाळ्यापूर्वी मिळावा यासाठी आले होते चेक वेळेवर मिळाला नाही तर सर्व लाभार्थी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.
