अनेक महिला सह पुरुष जखमी
श्रीक्षेत्र माहूर : परंपरेप्रमाणे दरवर्षी माहूर शहरात भाविक महिला कडून वटसावित्री पौर्णिमा निमित्त वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असताना वटवृक्षावरील मऊळ उठल्याने हजारो मधमाशांनी अचानकपणे महिला व रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषावर हल्ला करून अनेक महिलांना गंभीर जखमी केल्याची घटना दि 10 रोजी दुपारी 3.00 वाजता वार्ड क्रमांक 5 मधील हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या वट्यावर घडली आहे
परंपरेप्रमाणे दरवर्षी वार्ड क्रमांक पाच मधील हनुमान मंदिरा वरील वट्यावर हजारो महिला दिवसभरात येऊन वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असतात सकाळी 11:25 मिनिटांनी मुहूर्त असल्याने महिलांनी तोबा गर्दी केली होती तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती धुप लावून नारळ अर्पण करत वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा अर्ज सुरू केली होती.
दुपारी तीन वाजता अगरबत्ती धूप चा दुप्पट जास्त झाल्याने शेजारीच झाडावर असलेल्या माऊळातील मधमाशांनी अचानकपणे येथे आलेल्या महिलावर हल्ला चढवला यामध्ये सौ चंदा दिलीप पांडे वय 65 राहणार ब्राह्मण गल्ली माहूर आणि रस्त्यावरून चाललेले विलास मोतीराम पवार 45 वर्षे राहणार बंजारा तांडा माहूर यांच्यावर शेकडो मधमाशांनी हल्ला करत कडाडून चावे घेतले त्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले तर अनेक महिलांना मधमाशांनी चावा घेतल्याने महिलांनी तेथून पळ काढला घटना पाहून अनेकांनी आपल्या वाहनाद्वारे दोघांना ग्रामीण रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मागेही मधमाशा लागल्याने त्यांनी कसेबसे ग्रामीण रुग्णालय गाठले येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण वाघमारे यांनी जखमीवर उपचार केले.

