गावाकडची बातमी 🚍किनवट/ फुलसांवगी बसला सांबरलोळी जवळ अपघात

 

Accidentnews


चालकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..!




नांदेड :- किनवट ते फुलसावंगी बोरगाव मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लाल परीला अपघात झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.बस चालकांच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

    किनवट आगारातून मारेगाव,बोरगाव,सिंदगी (मो) मार्ग फुलसावंगी बस धावत असुन दुपारी १.३० वाजता सुटणारी बस फुलसावंगी वरून परत किनवटकडे जात असताना जवळपास पाच वाजताच्या सुमारास कनकवाडीच्या काही अंतरावर ही घटना घडली.रस्ताच्या बाजूला उभा असलेला ट्राक्टरच्या बाजुने बस काढताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हल्लीच बनविण्यात आलेल्या डांबरीकरण व रस्त्याच्या बाजूने भर म्हणून टाकण्यात आलेली माती ही पुर्णतः भुसभुशीत असल्याने बसचे पुढील व मागील दोन्ही चक्के खोलवर फसल्याने बस एकाच बाजूने झुकली.

    परंतु चालकांच्या सतर्कतेमुळे बस पलटी न होता पुर्ण झुकली या छोटा अपघात घडताच आतील प्रवाशांनी भितीने एकच गोंधळ उडाला.बस चालक व वाहकाने आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व प्रवासांची कोंडी होऊ नये म्हणून खाजगी वाहनाने किनवट येथे पाठविण्यात आले.

     ग्रामीण भागातील रस्ते हे अपघाताना आमंत्रण देणारे ठरत आहे.ग्रामीण भागातील रस्त्यांना रूदीकरणाचे ग्रहण लागले आहेत.कारण अरूंद रस्ते असल्यामुळे एक वाहनाला रस्त्याच्या खाली उतरावे लागते.त्यातही रस्त्याच्या कडेला भरण्यात आलेला भर मातीच सुदैवाने आज जीवितहानी टळली.भविष्यात देखील टळेल याची हमी सार्वजनिक बांधकाम विभाग देऊ शकेल काय?

Post a Comment

Previous Post Next Post