The layout of farm group no. 348 within the limits of Kothari Gram Panchayat is fake.
कोठारी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेत गट क्र.३४८ मधिल १ हेक्टर ४१ आर क्षेत्रफळ, अकृषीक आदेश क्र.२००१/एन.ए./सी.आर.११, आणि तहसिलदार आदेश क्र.२००१/एन.ए./सी.आर-११ दि.९ नोव्हेंबर २००१ अन्वये संचिकासह अकृषीक परविन्याची माहिती मिळवण्यासाठी तहसिलदारांंना दिलेल्या पत्रानंतर अभिलेखे शाखेत या संबंधी कसलीही संचिका आढळून आली नसल्याचे १० फेब्रुवारी २०२५ च्या परत टपालीच्या पत्रात तहसिलदारांनी नमूद केल्याने अकृषीक (एन.ए.) परवानाच बोगस असल्याचा मुद्दा समोर आलाय.
परवान्यावरील स्वाक्षरी आणि शिक्का देखिल खोटाच असल्याचे स्पष्ट होतेय. खोटा एन.ए.ग्रामपंचायतीकडे ले-आऊटच्या मंजुरीसाठी दिला असेल तर ग्रामपंचायतीने कागदांची खातर जमा केली होती काय ?
कोठारी पासून दिड कि.मि.च्या आसपासच्या निर्वस्ती असलेल्या कृषी उपयोगी शेतीतील प्लाॅटींगला मंजुरी का द्यावी ?
प्लाॅट विक्रीसाठी लागणारे गावठाण प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्या चौकटीत बसत नसतांनाही दिल्याशिवाय दस्त नोंदनी झाली नाही. कसलीही वैधता नसलेल्या प्लाॅटींगला ग्रामपंचायत आणि कंचर्लावारांनी मयत श्रीनिवासच्या नावाने एन.ए. असलेल्या परवान्याचा वापर करुन लोकांची फसवणूक केल्याचा ठपका लोखंडेंनी ठेवला आहे.
दुय्यम निबंधकांनी ही बाब का तपासली नाही ?
अधिकृत एन.ए.नसेल तर कृषी उपयोगी शेतीतील प्लाॅट विक्री केलीत. म्हणजे ७/१२ वर शेती कायम आहे. भविष्यात त्याच आधारे शासनाचे सर्व फायदे उचलायला मोकळे. बँकेकडून पीक कर्जही यापुर्वी उचलल्याच्या घटना ऐकायला मिळाल्या. कंचर्लावारांनी सन.२०१० लोखंडेंची शेती विकत घेतली असून एन.ए.मात्र श्रीनिवास लोखंडेंच्या मृत्यूनंतर तोच दस्तला जोडून नोंदनीवर सपाटा लावलाय. या एन.ए.चा आणि मयत श्रीनिवासचा तिळमात्र संबंध नाही. २००१ च्या श्रीनिवासांच्या नावाने असलेला एन.ए. दहा वर्षानंतर कंचर्लावारांच्या प्लाॅटच्या दस्त नोंदनीला जोडत असतांना दुय्यम निबंधकांनी ही बाब का तपासली नाही ?
मालमत्ता कंचर्लावारांची आणि एन.ए.मात्र लोखंडेंचा हा शुद्ध कलगीतुरा चालऊन सर्वांच्याच डोळ्यात धूळ फेक केल्यामुळे नितीन लोखंडेंनी कारवाईसाठी सदरचे प्रकरण सहायक जिल्हाधिकार्यांच्या दरबारात पाठवल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
Tags : #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #बनावट_ले_आऊटला, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment , #अकृषीक, GavakadachiBatmi.com. #तलाठी, #तहसीलदार, #शेतकरी, #शेती, #ग्रामपंचायत, #किनवट, #कोठारी_ग्रामपंचायत, जिल्हाधिकारीनांदेड , #Kothari_GramPanchayat,