स्वयंम रोजगार निर्मिती करण्यासाठी ग्राम पंचायत कटिबद्ध! प्रशांत इंगळे
मुर्तिजापूर - तालुक्यातील रंभापुर गट ग्राम पंचायतीच्या वतीने अपंग व दिव्यांग व्यक्तींनी दुसऱ्या कुणावरही अवलंबून न राहता स्वतः रोजगानिर्मिती करावी या उदात्त हेतूने त्यांना कलर झेरॉक्स मशीन,लॅपटॉप तसेच इतर साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत चे सदस्य तथा माजी सरपंच प्रशांत इंगळे,प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच वंदना टेकाडे,रमेश नीलखन उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून ग्राम विकास अधिकारी व्ही. आर. गावंडे हे होते. अपंग व्यक्ती तसेच दीव्यांग
व्यक्तींनी स्वतःला कमजोर समजू नये त्यांचा रोजगानिर्मिती ची जबाबदारी ग्राम पंचायत घेण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मा.सरपंच प्रशांत इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणी पुरवठा कर्मचारी राजू वानखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोपीचंद इंगळे यांनी मानले. या प्रसंगी सदस्य सुनील रोकडे,किशोर वानखडे, नलूबाई सुळे, स्वप्नाताई वाघमारे, सुधाकर टेकाडे,श्रीकृष्ण चव्हाण,अरुण सरदार, नंदू अढाउ, बाळासाहेब देशमुख,अवधूत किर्दक किशोर सुळे,मंगला पांचाळ इत्यादींची उपस्थिती होती.