नेहरु युवा मंडळ व तरुणाई फाउंडेशनने केला सन्मान
मूर्तिजापूर - तालुक्यातील सालतवाडा येथील युवा गजानन सखारामजी चव्हाण यांचा नुकत्याच संपन्न झालेल्या शुभंम मराठी साहीत्य मंडळ, अकोला च्या दहाव्या साहित्य संमेलनात समाजिक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रविवार दि. 23 मार्च 2025 ला बहादुरा येथिल शेतकरी वाडा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बाल किशोर युवा व नवोदित साहित्य सम्मेलनात संमेलनाध्यक्ष वऱ्हाड़ी साहित्यिक शिवलिंग काटेकर, उदघाटक बालकलाकार धर्मविर -2 फेम अथर्व मोटे , स्वागताध्यक्ष विठ्ठलराव माळी, डॉ.प्रा.संतोष हुशे,अभिनेता डॉ.तुषार बैसणे, कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापुर संचालक संदिप पाटील लोड, प्रा.ममता इंगोले , दिपाली सोसे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत गजानन चव्हाण मुलगा श्रेयश त्यांच्या पत्नी प्रिय़का चव्हाण यांना अभिनेता डॉ. तुषार बैसणे व बालकलाकार अथर्व मोटे (धर्मवीर) फेम 2 यांनी सम्मानित करण्यात आले.
नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापुर च्या व्हाट्स अप आवाहना नुसार गजानन चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा व ध्येयवादी वृत्तीचा प्रस्ताव दिला असून त्यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय बहिण,जावई व गुरु,पत्नी मुलगा यांना दिले आहे व आई बाबा यांच्या चरणी समर्पित केला आहे. तर नेहरु युवा मंडळ अध्यक्ष अनिल डाहेलकर, व यांचे आभार मानले आहेत.
चव्हाण यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने आप्तजनांसह मित्र परिवार,होमगार्ड पथक मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन मुर्तिजापुर,स्वच्छता अभियान टिम व जि.प.शाळा सालतवाडा गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.