राजुरा सरोदे येथे विपश्यना केंद्राचे उदघाटन.




मूर्तिजापूर - तालुक्यातील बुद्ध टेकडी राजुरा सरोदे येथे विपश्यना केंद्राचे उदघाटन करण्यात आले.उदघाटक म्हणून डॉ.आचार्य कमलताई गवई,तर प्रमुख अतिथी आचार्य ओमप्रकाश गडलिंगे, एस. एस. शिरसाट,मधुकर लामसे,डॉ.सोमेश्वर तेलमोरे इ उपस्थित होते.

विपश्यना प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांना शुध्द जीवन जगण्याचा मार्ग दिसेल असा आशावाद उदघाटक .आचार्य कमलताई गवई यांनी आपले मनोगत व्यक्त केला.त्याच बरोबर निसर्ग संवर्धन करण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला प्रास्ताविक संस्थेचे संचालक दिनेश वानखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिसरातील नागरिक मंडळी उपस्थित होती. मीना मराठे,चांदणी अटवर्धन,सुनीता नागदीवे, चंदा बोरकर,माताजी बेबीताई भगत,राघोजी भगत,साहेबराव सरदार,सिद्धार्थ किर्दक,माजी सैनिक शंकरराव भगत, देवराव भगत,तुकाराम जामनिक,प्रमोद इंगळे, संजय वानखडे, प्रमोद वानखडे, इंगळे गुरुजी, चंदू वानखडे, योगेश वानखडे, नागोराव बनसोड,रमेश इंगळे,सुरेशराव खांडेकर,बाळासाहेब ढोके, आनंद बनसोड, अँड. रोशन जामनिक,राजेश वानखडे, नंदलाल वर्घट, दिनेश वानखडे,शशिकांत भगत या सर्वाची उपस्थिती होती.सुत्रसंचालन प्रमोद इंगळे तर आभार डॉ.सोमेश्वर तेलमोरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post