आदित्य सोळंकेची जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड.

 

प्रकाश वाट प्रकल्पाचा विद्यार्थी





मूर्तिजापूर - तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय ,माना येथील वर्ग पाचवी चा विद्यार्थी आदित्य योगेश सोळंके याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे .जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जानेवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आली असून या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद विद्यालय, मानाने नवोदय विद्यालयासाठी विद्यार्थी पाठवण्याची परंपरा कायम ठेवत आदित्य सोळंकेने या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अतिशय जिद्दीने, तळमळीने, मेहनतीने अभ्यास केला तसेच इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका पिंजरकर मॅडम यांनी बुद्धिमत्ता विषयाचा अतिशय उत्कृष्ट रित्या सराव करून घेतला आणि जवळपास 20 सराव पेपर चे आयोजन सुद्धा केले . श्री पांडे सर यांनी गणित विषयाचा अतिशय चांगल्या प्रकारे सराव करून घेतला. श्री चव्हाण सर यांनी मराठी विषयाचा छान सराव करून घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजानन गिरी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अजाबरावजी गुडदे सारिका पिंजरकर , खंडेराव पांडे , सतीष गोकणे, अनुषक्ती वानखडे, पुरुषोत्तम कदम लाला तवाडे ,शिल्पा पाठक,भुवनेश्वरी सुसतकर, उत्तम चव्हाण, शिल्पा तेलखेडे, सुरेश राठोड ,प्रशांत सावजी ,विनोद देशमुख आणि समस्त पालक वर्गाकडून आदित्यचे अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post