सिरसो गायरान परिसरात अनैतिक संबंधच्या संशयावरून युवकांची निर्घृण हत्या..!

 

तीन महिलासह दोन पुरुष गंभीर जखमी उपचारार्थ अकोला रेपर.


हिरपूर रोडवरिल सिरसो गायरान झोपडपट्टीतील घटना 


 सिआरपीएफ सह पोलीसांचा तगडा बंदोबस्त ; परिसराला छावणीचे स्वरूप

     



मूर्तिजापूर - तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरपूर रोडवरील सिरसो गायरन परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून फासेपारधी समाजाच्या १९ वर्षीय युवकांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली तर ८ जण यामध्ये महिला ही गंभीर झाल्याची घटना २५ मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली आहे.

     मूर्तिजापूर शहराजवळ हिरपूर रोडवर असलेल्या सिरसो गायरान (पारधी वाडा )परिसरात आज दि. २५ रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशया वरून फासेपारधी समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एका १९ वर्षीय युवकाची  कुऱ्हाडीने निर्गुण हत्या करण्यात आली तर या वादात इतर ८ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

रेणुका दयावान घोसले वय ३० वर्ष रा. सिरसो गायरान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे चंदू दामू घोसले हे सदर ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात त्यांना तीन मुलं व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे. तिचे पती राहुल चव्हाण याचे प्रदीप किशोर घोसले यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला. या वादाचा निपटारा दि २४ रोजी मूर्तिजापूर  ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाले असतांना परत दि. २५ च्या सकाळी सदर वाद पुन्हा उफाळला या वादाचे रूपांतर क्षणातच हाणामारीत होऊन यात १९ वर्षीय सूरज चंदू घोसले रा. सिरसो गायरान या युवकाची कुऱ्हाडीने अमानुष रित्या मानेवर वार केल्याने जागीच मृत्यू झाला. तर इतर सात ते आठ जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारार्थ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे सिरसो गायरन परिसर व श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयास पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. राज निर्दोष घोसले वय २२ वर्ष , दिपक लक्ष्मण पवार ,वय ३० वर्ष, प्रदीप किशोर घोसले, वय २५वर्ष,करण किशोर घोसले, यांच्यावर कलम १०३ (१),१०९ ,३५१(२)३५२,3(५) बिएनएस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे , पिएसआय वानखडे, पिएसआय सामतकर , एएसआय संजय खंडारे, एएसआय लांजेवार, पोकॉ रितेश मडडी, शंकर खेडकर, गणेश ठाकरे, सुदाम धुळगुंडे हे तपास करित आहेत. 

-----------------------------------------

 परिसराला छावणीचे स्वरूप 

आरपीएफ सह शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचा ताफा हजर असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

---------------------------------------------

घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथक दाखल

Post a Comment

Previous Post Next Post