किनवट : गौरी (ता. किनवट) येथील कर्तव्यनिष्ठ पोलीस पाटील बाबाराव सोनेराव उमरे यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी 11 मार्च 2025 रोजी नांदेड येथे माननीय पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभास अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, भोकर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरने, गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष भास्कर कंकाळ, तसेच संघाचे राज्य संघटक संभाजी मडगीकर उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाबाराव उमरे यांनी गावाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या मेहनतीची आणि त्यागाची पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून त्यांच्या सन्मानामुळे संपूर्ण गौरी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर मित्र परिवारातून अभिनंदन आता वर्षाव होत आहे.
बाबाराव उमरे यांनी आपल्या कर्तव्यकठोर आणि समर्पित सेवेमुळे गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी गावकरी आणि सहकारी पोलीस पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.