राज्य लॉटरी विशेषांक २०२५ वर्धापनदिनानिमित्त आवाहन..!


      मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

गौरवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीचा शनिवार दि. १२ एप्रिल रोजी ५६ वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्याने परिपूर्ण संग्राह्य असा लॉटरी विशेषांक प्रकाशित करण्यात येणार असून ग्राहक, विक्रेते, वितरक, हितचिंतक, लेखक, छायाचित्रकार, व्यंगचित्रकार आणि अभ्यासकांना निमंत्रीत करण्यात आले आहे. एकीकडे ग्राहकांना बक्षिसे, दुसरीकडे विक्रेत्यांना रोजगार, तिसरीकडे सरकारला विकास कामांसाठी महसूल उपलब्ध करण्यात राज्य लॉटरीने गेली ५५ वर्ष महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. ५६ वर्षाच्या उंबरठ्यावर आज राज्य लॉटरी पोहोचली असून देशभरातील पारदर्शक, आदर्श लॉटरी म्हणून त्याकडे सन्मानाने बघितले जाते. लॉटरी विषयक लेख, मुलाखती, अनुभव, ईतिहास, व्यंगचित्रे, छायाचित्रे, काव्ये, भविष्यासाठी अपेक्षा या सर्वांचा विशेषांकात समावेश करण्यात येणार आहे. येत्या ५ एप्रिल २०२५ पूर्वी आपण आपले साहित्य, फोटो, लेखासह सुमित वि.सातार्डेकर, संपादक लॉटरी विशेषांक २०२५-११६,, सुखसागर को-ऑप हौ सो. राजाभाऊ देसाई मार्ग, प्रभादेवी मुंबई ४०००२५ मोबाईल नंबर. ९८९२८१७५९७ यावर संपर्क साधावा आणि विशेषांकात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post