पोलीस भरतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पोलीस पाल्य यांची वयोमर्यादा 38 वर्ष करावी - महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना

 


महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वतीने  पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन 



यवतमाळ -: महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ वतीने पोलीस भरतीमध्ये पोलीस कर्मचारी यांचे पाल्य यांना पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य आरक्षणतुन अर्ज करता येतात. पोलीस पाल्य यांचे वयाची मर्यादा 18 ते 33 वर्ष आहे.पोलीस पाल्य वयाची मर्यादा 18 ते 33 वर्ष दिली असली तरी पोलीस पाल्य यांचे मुलं एक तर 31 किंवा 33 वर्ष वयाचे असताना वडील सेवानिवृत्त होतात तेव्हा पोलीस पाल्य यांना पोलीस भरती देण्यासाठी एक किंवा दोन संधी मिळत आहे. कधी कधी पोलीस भरती झाली नाही तर वय संपून जात आहे.पोलीस भरती मध्ये पोलीस पाल्य वयाची मर्यादा 38 पर्यंत करण्यासाठी अनेक सेवानिवृत्त पोलीस पाल्य यांचे मत आहे.

 पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य वयाची मर्यादा वाढविण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले. 

  निवेदन देण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बोराडे , सचिव सोहेल काझी,सहसचिव संकेत अनविकर, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहल ताई रेचे, जिल्हा सचिव मोनिका बळीराम शुक्ला, पोलीस बाॅईज शैलेश नगराळे, , मयूर जवादे,अॅलेकस अहीर, कश्यप कांबळे,अजय पावडे स्वप्नील सोनवणे, शाहिद शेख, अभिजित आत्राम, मयूर ढाकणे, कुणाल कैतवास ,सुमीत पेंदोरे,जियुश उघडे,अदनय निबेकर,रोशन आमनेकर, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post