विशेष प्रतिनिधी/संतोष भालेराव/ परतवाडा
परतवाडा येथून जवळच असलेल्या गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग विभाग अचलपूर यांच्या देखरेखीखाली झालेल्या काॅंक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल गौरखेडा कुंभी येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे व इतर गावकऱ्यांनी सा. बां. वी. मंडळ अभियंता अमरावती यांच्या कडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने दिनांक २६/३/२०२४ रोजी प्रत्यक्ष प्रत्येक रस्त्यावर जाऊन अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता वानखडे त्याच बरोबर त्यांच्या सोबत उपविभागीय अभियंता अचलपूर बारब्दे साहेब व उप अभियंता श्री बिरादर हे सुद्धा हजर होते गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या ९५/५ व २५/१५ या निधीतून झालेल्या सर्वच वार्डातील काँक्रिट रस्त्याचे काम खुपचं निकृष्ट दर्जाचे झाले. असल्याचं गावकऱ्यांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले होते रस्त्यांची पाहणी करताना तक्रार कर्ता नितीन शिंदे यांनी स्वतः हजर राहून सर्व बाबी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या यावेळी त्यांच्या सोबत पंकज इंगळे व इतर गावकरी हजर होते पाहणी केल्यानंतर सर्व रस्त्यांची चौकशी करून रस्ते दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितले आहे.