मायक्रो फायनान्स कंपन्या नियमबाह्य आहेत की काय तपासण्याची गरज !
परतवाडा/ संतोष भालेराव -: अचलपूर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील महिलांचे गट तयार करून भारत मायक्रो फायनान्स कंपनी चे कर्मचारी महिलांना कर्जाचे वाटप करत असतात पाच पाच महिलांचा एक एक गट बनवून कर्जाचे वाटप केले जाते फक्त महिलांसाठी मर्यादित असे हे कर्जवाटप धोरण आहे आठवड्यातील एका दिवशी कोणत्याही गटातील एका महिलेच्या घरी जाऊन मिटिंग भरवून कर्जाची वसुली केली जाते परंतु त्यामध्ये गटातील एका महिलेने कर्जाची रक्कम त्या वेळी त्या दिवशी भरणा न केल्यास इतर सर्व महिलांना कंपनी चे कर्मचारी उलट सुलट नियम सांगून वेठीस धरतात व तुम्हीच त्या महिलेच्या घरी जाऊन पैसे वसूल करून आणा नाहीतर तुम्हाला आम्ही इथेच बसवून ठेवणार आम्ही त्या महिलेला कर्ज नाही दीले सर्व गट मिळून दिले आहे तुम्ही पहा ते काय आहे आम्हाला नाही माहिती अशी भाषा वापरून काही कर्मचारी म्हणतात की द्या ते पैसे फेकून काही कर्मचारी गावातील ग्रामीण महिलांच्या अंगावर सुद्धा धावुन जातात व दादागिरी ची भाषा वापरून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम करत आहेत हेच कर्मचारी यांना कंपनी ने दिलेले टार्गेट पुर्ण करण्यासाठी काही महिलांना जबरदस्तीने कर्जाचे वाटप करतात व त्या महिलेने कर्जाचे हप्ते थकवले तरीही बाकी गटातील महिलांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देऊन वेठीस धरतात अशा बेकायदेशीर पणे धमकावून व गलिच्छ भाषा वापरून कर्जवसुली करणार्यांना धडा शिकवला पाहिजे व अशा ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंपन्या ची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यासाठी गौरखेडा कुंभी येथील महिला आता सरसावल्या आहेत.
गुरूवार दिनांक २६/३/२०२५ रोजी गौरखेडा कुंभी येथील एका महिलेच्या घरी झालेल्या कर्जवसुली साठी झालेल्या मीटिंग मध्ये भारत मायक्रो फायनान्स कंपनीच्या एका दादागिरी टाईप कर्मचाऱ्यांने तेथील काही महिलांना गलिच्छ भाषा वापरून वेठीस धरण्याचे पाहिले गेले आहे त्या महिला आता वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.