शिराळा येथे नाफेड हमीभावानुसार तुर खरेदी केंद्राचा उद्घाटन समारंभ संपन्न



       जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर                                                         

शिराळा:- चिरायुसप्तऋषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड महाकिसान वृध्दी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिराळा येथे नाफेड हमीभावानुसार तुर खरेदी केंद्राचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला .यावेळी अशोकराव राणे नितीन देशमुख, शरद भोवाळु, सारंग राऊत, प्रभुराज बारबुदे, शिवाजी खाडे, बाबुराव बोराळकर , प्रकाशराव पावडे आदी कंपनीचे संचालक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.तुर उत्पादक पाच शेतकऱ्यांना दुपट्टा, नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शिराळा येथील शेतकरी उद्धवराव भोवाळु, अभिजित देशमुख,जयेश टेकाडे, दिनेश पाटील, विकास देशमुख, आशिष उके, चंद्रशेखर लव्हाळे, डी आर वानखडे, दिलीप बाबंल, अभिषेक देशमुख, सतिश कुसटकर, विनोद उके, मनोहर कोल्हे , सचिन ठाकरे आदी उपस्थित होते . यावेळी शिराळा परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post