आदिवासी पारधी समाज भगीनी उपोषणकर्त्या वैशाली पिंपळे यांचे अनुसूचित जाती जमाती आयोगास निवेदन





   मुंबई, दि. 27 : आझाद मैदानावर न्यायासाठी मागील २८ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी पारधी समाज भगीनी वैशाली पिंपळे (रा. गणेश नगर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांनी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना वरळी येथील अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे कार्यालयात निवेदन दिले. 

     या निवेदनात श्रीमती पिंपळे यांनी राहुल पिंपळे व भरत काळे यांच्या खुनाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत करण्याची मागणी केली आहे. 

  यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम म्हणाले, हे निवेदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी तत्काळ प्रभावाने कार्यवाही करावी व त्या माहितीचा तपशीलवार अहवाल पाठविण्या संबंधी पत्र लिहून निर्देशीत केले.

याबाबत आयोगाच्या कार्यालयात दि ७ एप्रील ला तक्रारकर्ते महिला पुरुष व उपरोल्लेखित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात येईल व ह्या गरीब आदिवासी परिवारासह न्याय मिळवून देण्यासाठी अनु जाती जमाती आयोग पुढाकार घेईल असेही त्यांनी सांगितले. 

   याप्रसंगी आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी मीनाक्षी आडे, पोलिस निरीक्षक सोनम पाटील, विधी सहायक ॲड. राहूल झांबरे उपस्थित होते.


   

Post a Comment

Previous Post Next Post