माहुर : माहुर तालुक्यातील पालईगुडा ज़िल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालईगुडा येथील
तब्बल ५ विद्यार्थी यशस्वी
ज़िल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालईगुडा तालुका माहूर जि. नांदेड येथील दरवर्षी नवोदय परीक्षेत यशस्वीता प्राप्त करण्याची परंपरा विद्यार्थ्यांनी याही वर्षी कायम ठेवत ५ विद्यार्थी यशस्वी झाले.
१)योगीराज संदीपान वाघाडे
२)अर्णेस्टो अमोल आडे
३)ओमकार संदीप पवार
४)प्रज्ञा ज्ञानेश्वर करपते
५)गौरी लुकेश जाधव
विद्यार्थ्यांच्या अफाट मेहनतीने व जिद्धीने त्यांनी ही यशस्वीता प्राप्त केली.
यात त्यांचे वर्गशिक्षक आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. जि. कुडे यांचे अमूल्य मार्गदर्शन मुलांना मिळाले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक पिसलवार, शिक्षक गुडेटवार, शिक्षक राठोड, शिक्षक जाधव, शिक्षक कांबळे, लंजे शिक्षिका ,शिक्षक आडे , शिक्षक चौधरी, शिक्षक मगर,शिक्षक मुनेश्वर यांचेही मार्गदर्शन मिळाले..