किनवट,माहुर : बाळु पवार हे सरचपंच संघटनेचे संघटक असून किनवट माहुर तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सुद्धा सरपंचाना मार्गदर्शन करतात तसेच वेळ काढून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात यासह ग्रामीण भागातील घरकुल विहीर राशन कार्ड अशा गोरगरीब लाभार्थीच्या छोट्या छोट्या समस्या फोन करताक्षनी सोडवित असतात.
तळागाळातल्या कार्यकर्त्याशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. व सहज रोज पंचायत समिती किनवट येथे बाळू पवार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असतात वेगवेगळे योजनेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ती माहिती देत असतात त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर सुद्धा मजबुत पकड आहे. त्यांनी दि 20 रोजी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत वैजनाथ करपडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शरदचंद्र पवार तुतारी सोडुन अजित पवार यांची घड्याळ हाती बांधली आहे. आणि किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून संधी उपलब्ध करून देऊ गावातील समस्या सोडवण्यासाठी विकास निधी उपलब्ध करून देऊ असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
व दि 28 फेब्रुवारी नांदेड येथे अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेशासाठी येण्याचे आव्हान केले आहे त्यामुळे गाव गाड्यावर काम करणाऱ्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
त्यामुळे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीला किनवट / माहूर विधानसभा क्षेत्रात मोठा धक्का पडण्याची चर्चा जोर धरू लागली..