शिवसेना अमरावती तालुका प्रमुख मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वावर विश्वास.
जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर शिराळा
अमरावती, शिराळा : स्थानिक शिराळा येथे शिवजयंतीच्या आनंदमयी पर्वावर शिराळा येथील रहिवाशी असलेले राजकीय वारसा प्राप्त व संपूर्ण मतदारसंघांमध्ये जनसामान्यांचे परिचित असलेले शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिराळा येथील महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षामध्ये शिवजयंतीच्या पर्वावर जाहीरपणे प्रवेश घेतला. व त्यानिमित्ताने शिराळा येथे महिला शिवसेना शाखा गठीत करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व मूर्तीचे पूजन व हारार्पण अमरावती तालुका प्रमुख मंगेश काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार व शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत शिराळा गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतला व अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना शाखा गठित करून प्रवेश घेणाऱ्या महिलांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी महिला शिवसेना शिराळा शाखाप्रमुख पदी कीर्ती अमोल जवंजाळ व शिवसेना उपशाखा प्रमुख पदी शुभांगी स्वराज मानकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच शाखा सचिवपदी सुषमा गजानन ढेवले, सहसचिव पदी सुषमा गोपाल उके, शाखा कोषध्यक्ष पदी नीता उमेश पटले, तर शाखा संघटकप्रमुख पदी स्वाती रवींद्र दहापुते यांची नियुक्ती करण्यात आली.
त्याचप्रमाणे शिवसेना सदस्य शिवसैनिक म्हणून प्रवेश घेणाऱ्या महिलांमध्ये नयना देशमुख, भावना काळमेघ, साधना पाटणकर, शोभाबाई देशमुख, कविता शेंडे, ललिताबाई मानकर, अर्चना ताजने, छायाताई टोम्पे, जयश्रीताई टोम्पे,प्रणालीताई टोम्पे,वैशालीताई कुकडे, आरती शर्मा, संगीता आखरे, उषाताई पाटणकर, बेबीबाई पाटणकर, स्वाती दहापुते, निता पटले, सुषमा उके,सुषमा ढेवले, किर्ती जवंजाळ, शुभांगी मानकर, नलुबाई जवंजाळ, कल्पना घुरडे, कल्पना जीभकाटे, व इतर ३० ते ३५ महिलांनी मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षांमध्ये जाहिररित्या पक्षप्रवेश केला.
यावेळी उपस्तित कार्यक्रमाला रमेशराव देशमुख, विजयराव देशमुख, अरुण टोम्पे, आशिष टोम्पे, बबलू मिसार, गणेशराव बोराळे, गणेश पाठक, रामराव बालपांडे, निलेश देशमुख, मंगेश देशमुख, अजय हरणे, प्रमोद हटवार, शिवसेना शाखाप्रमुख वैभव मुंदाणे, सहसचिव भूषण पाटणकर, शाखा संघटक निलेश कुकडे, शाखा सचिव अर्पित नवरंगे, कोषाध्यक्ष कैलास मानकर, उपशाखाप्रमुख स्वप्नील जीभकाटे, मीडिया प्रमुख रितेश देशमुख, युवाशक्ती ग्रामविकास संघटन चे उपजिल्हा प्रमुख पवन पाटणकर, शिवसेनेचे निलेश रिठे, गौरव नागपुरे, साहिल राणे, सार्थक टोम्पे, तेजस टोम्पे, आशुतोष देशमुख, सौरभ देशमुख, अमर ताजने,राहुल टोम्पे, जय देशमुख, संकेत जीभकाटे,रामविजय ताजने,आशिष वडे, संदीप तुळे, अक्षय कावरे, प्रफुल कडू, सुरज उके, कुंदन राऊत, शुभम वाडेकर, आशिष बांबल, रितेश घुरडे, राजेश कुकडे, भूषण पटले, दिनेश पटले, प्रवीण राऊत, सतीश पटले, स्वराज मानकर, दुर्गेश मानकर, सतीश मानकर, रोशन पाटणकर, वेदांत मयांडे, आदेश पाठक, सुरेश गंधे, प्रेम जीभकाटे आदी शिवसैनिकांनी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.