किनवट येथे शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर मोहल्ला या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 



किनवट : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कलावती गार्डन किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा वारसा सांगणारे व महाराज कोण्या विशिष्ट जाती धर्माचे नसून त्यांचे विचार सर्व बहुजनासह संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे होते तसेच महाराजांचे विचार राष्ट्राचे संपत्ती आहे हे पटवून सांगणारे विद्रोही नाटक शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर मोहल्ला या नाटकाचा नाट्यप्रयोग शिवजन्मोत्सव दिनी आयोजित करण्यात आला.

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या आयोजित नाट्यप्रयोगाला किनवट व परिसरातील हजारो शिवप्रेमींनी ज्येष्ठ मंडळी सह बंधू भगिनींनी हजेरी लावली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम तर उद्घाटक माजी नगराध्यक्ष इसाखान  यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होती. 



   सदर नाट्य प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. सूत्रसंचालन प्राध्यापक दगडू भरकड यांनी केले तर प्राध्यापक शिवदास बोकडे यांनी आभार प्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती समितीने अनिष्ट समजल्या जाणाऱ्या डीजे संस्कृतीला फाटा देऊन उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनासह सर्व स्तरातून उत्सव समितीचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post