सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अमरावती च्या वतीने शिवाजी महाराज जयंती निमित्य विविध स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये शालेय व महाविद्यालयीन विधार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 16 फेब्रुवारी ला शिवटेकडीवरील खुल्या विचारमंचा वर वक्तृत्व स्पर्धा, निबंध घेण्यात आली. निबंधचा विषय होता. "छत्रपती शिवाजी महाराज, एक शूर योद्धा. शब्द मर्यादा 1500शब्द. जवळपास तीनशे विधार्थ्यांनी आपले कला, विचार, अक्षराचे माध्यमातून आपले निबंध आयोजन समिती कडे सादर केले.
तेव्हा आलेल्या निबंधा मधून योग्य परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले त्यावेळी खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकांची मानकरी ठरली इंडो पब्लिक स्कूल अमरावती वर्ग 8 ची विधार्थिनी कु. स्वरा संजय कांबळे. हिला प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व माँ जिजाऊ चे पुस्तके मान्यवरांचे हस्ते देऊन शिवजयंती दिनी शिवटेकडी वर सन्मानीत करण्यात आले.
त्यावेळी मंचावर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष, मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र आडे, व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभा खोडके, माजी खासदार अनंत गुढे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, रामेश्वर अभ्यंकर व शिवगड सवर्धन समितीचे दिनेश बुब यांनी कु स्वराचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी शिवजयंती कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती.