सिंदगी (मो.) येथे आजपासून अखंड संगीतमय भागवत कथा सप्ताहाची सुरुवात.

 


किनवट: दि.२० फेब्रुवारी 2025 पासून सिंदगी (मो.) ता. किनवट येथे अखंड संगीतमय भागवत कथा सप्ताहाची सुरुवात होणार आहे. भाविक भक्तांनी सप्ताहातील भागवत कथेसह सर्वच कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


      सप्ताहातील किर्तनकार २0 फेब्रुवारी रोजी ह.भ.प.समय वानखेडे (बाल किर्तनकार)सिंदगी, २१ रोजी ह.भ.प.खंडू महाराज सांडवेकर, २२ दिव्याताई रनमले (काळी टेंभी), २३ रोजी ह.भ.प.आनंदराव महाराज हातलेकर, २४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज कटारी (मुडणा), २५ रोजी ह.भ.प.रमेश मगर महाराज ( नर्सी नामदेव), २६ रोजी ह.भ.प.वेणूताई पाटील (रिसोड), २७ रोजी ह.भ.प. सुभाष महाराज सोंडेकर वाशिम काल्याचे कीर्तन असेल. 



     २७ फेब्रुवारीलाच महाशिवरात्री च्या पावनपर्वावर महाप्रसाद होणार आहे. सप्ताहा दरम्यान भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण,भागवत कथा, काकडा, असे विविध कार्यक्रम संपन्न होणार असल्याने भाविकांनी आवर्जून सप्ताहातील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post