शेवटच्या घटकांपर्यंत कृषि योजना पोहचवीने हेच माझे ध्येय


कृषि सहाय्यक मारोती जाधव यांचे प्रतिपादन



       जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर  

अमरावती :  येथील सांयन्सकोर मैदान येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय कृषि विकास परिषद व प्रदर्शनीमध्ये नुकतेच कृषि साहाय्यक मारोती जाधव यांना कृषि प्रचारक ( शेतकऱ्यांचा दुत)म्हणून गौरविण्यात आले.

     कृषि व कृषि संलग्न योजनेची माहिती प्रचार व प्रसिद्धी करुन तळागळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळण्यास मदत झाली.

  गावातच खरीप पुर्व सभा घेऊन.पिक पध्दती नुसार लागवडीचे सुक्ष्म नियोजन, मातीतील घटकानुसार खतांचा वापर.भरडधान्य लागवड. बिजप्रक्रिया .बियाणे उगवण तपासणी .पट्टापेर पध्दतीचा अवलंब करण्यासाठी युवा व अनुभवी शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे.शिवार फेरीचे आयोजन करुन इतरांना प्रोत्साहित करणे.पिक स्पर्धा आयोजित करून अधिकचे उत्पन्न घेणार्‍या शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी बांधावरच सपत्नीक सत्कार.महापुरुषांच्या जयंती निमित्त ग्रामस्वच्छता."एक पेंड मां के नाम" अंतर्गत वृक्षारोपण व झाडे वाटप.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गावात जनजागृती.किड व रोगाचे नियंत्रणासाठी हंगामानुसार वृतपत्राद्वारे,तसेच सभा,चर्चासत्राचे आयोजन.पि,एम,किसान.ॲग्रीस्टॅक या योजनेची व्याप्ती व शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रचार.अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन,शेतकऱ्यांचे जिवनमान व विभागांची प्रतिमा उंचवण्यासाठी अनेक उपक्रम ग्रामस्तरावर राबवित असतात.

   खर्‍या अर्थांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्ना बरोबरच अर्थिक स्थैर्य यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेती निगडीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांचा आयोजक तथा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने ,जिल्हा अधिक्षक राहुल सातपुते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


नैसर्गिक शेतीस चालना,महिलांचा कृषिक्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी गटांची स्थापना व शेतकऱ्यांचे अधिकचे उत्पन्न वाढावे यासाठी बांधावरच नवनवीन तंत्रज्ञानांची माहिती पोहचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.

तालुका कृषी अधिकारी अमरावती

             प्रशांत गुल्हाने


कृषि विभाग -आपल्या दारी" कार्यक्रमा अंतर्गत "डोर टु डोर" अभियान राबवून कृषि व कृषि संलग्न योजनेच्या लाभाची व्याप्ती बरोबरच.बेड वर १५०० एकरावून अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

      कृषि सहाय्यक- शिराळा

           मारोती जाधव

Post a Comment

Previous Post Next Post