जनजागृती सेवा संस्थच्यावतीने डोंबिवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजंयती उत्साहात संपन्न

 



डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)जगाच्या इतिहासात शिवजंयतीचे महत्व विशेष असेच आहे.या सोनेरी दिवसाच्या आठवणीने मनाला उभारी मिळते,तो हा सोनेरी दिवस.जगभरात शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.त्या अनुषंगानेच या पवित्र दिनी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने डोंबिवली पुर्व येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरांगना ट्रस्टच्या फाऊंडर प्रेसिडेंट उमा सिंह,समाजसेवक,संस्थेचे जेष्ठ सदस्य-सल्लागार अरविंद सुर्वे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच म्युझिक मंत्रा एंटरटेन्टमेन्ट च्या संस्थापिका-संचालिका शर्मिला केसरकर,साई-श्रध्दा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-कैलास सणस,हिंद सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेश दाभोळकर,संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,सह खजिनदार श्रुती उरणकर,सविता ठाकुर,आरती परब,नुतन यादव यांनी शिवरायांच्या चरणी गुलाब पुष अर्पून,नतमस्तक होत अभिवादन केले.

जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.तसेच संस्थेच्या सह खजिनदार श्रुती उरणकर यांनी प्रमुख पाहुण्या उमा सिंह,शर्मिला केसरकर यांचा संस्थेचे आभार पत्र,शाल,गुलाब पुष देऊन सत्कार केला.तसेच प्रमुख पाहुणे कैलास सणस,जयेश दाभोळकर यांचा संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांनी संस्थेचे आभार पत्र,शाल,गुलाब पुष देऊन सत्कार केला.याप्रसंगी साई-श्रध्दा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सणस यांनी सर्व समावेशक,समोयचित भाषण केले.तसेच हिंद सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेश दाभोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी कैलास सणस यांचे विशेष सहकार्य लाभले.जय भवानी,जय शिवाजी तुतारीच्या गजरात शिवाजी महाराजांच्या जय घोषात शिवजंयती उत्साहात संपन्न झाली.शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post