झेविअर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेवियर्स हायस्कूलचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

 



मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)पदविदान समारंभ म्हणजे आनंद,सांस्कृतिक कार्यक्रम,हर्षौउल्हास विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.मुंबई मधील अग्रगण्य बोरीवली पुर्व येथील झेवियर्स हायस्कूल.झेविअर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेवियर्स हायस्कूल बोरीवली पुर्व यांचा पदविदान समारंभ१८फेब्रुवारी२०२५रोजी प्रबोधनकार ठाकरे सभागृह,बोरीवली येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी त्यांच्या अप्रतिम डान्स मूव्ह आणि परफाॅरमन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.स्किट-क्रोकने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि'आम्ही प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही'असा संदेश दिला.विद्यार्थ्यांच्या रंगीबेरंगी आणि तेजस्वी वेशभूषेने कार्यक्रमात चैतन्य आणले आणि कार्यक्रम पाहण्याचा आणि आनंद घेण्याचा देखावा बनवला.

 डोरिस रावल(क्यूएटी को-ऑर्डिनेटर)यांनी यावेळी उपस्थित राहून मुलांना त्यांच्या विशेष दिवशी आशिर्वाद दिले.याप्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे होते,हंसा गग्गर(हंसा गग्गर-अॅड असोसिएशनच्या मालकीण आणि काॅर्पोरेट लाॅयर),कु.अंकिता लोखंडे(मनोरंजन पत्रकार आणि अँकर), अस्मिता चौगुले(सामाजिक संस्था संघटनांच्या सल्लागार आणि फ्रीलान्सर-अनेक राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या),सुश्री ध्वनी मार्केटिंग आणि ब्रॅडिंग ब्रॅण्डी-एआय-प्रती, मुनीर कलावूर(एन्ड्युरन्स अॅथलिट,खाजगी धावण्याचे प्रशिक्षक आणि फिटनेस मेंटाॅर),डाॅ.महेश अभ्यंकर(प्रसिद्ध वैद्यकीय सल्लागार,लेखक,फार्मास्युटिकल आणि स्ट्रॅटेजी एक्सपर्ट),भावेश साओ(राज्य समन्वयक,इंडियन रेड क्राॅस सोसायटी,महाराष्ट्र),शैलेश भोजक(सहाय्यक डायरेक्ट प्रोजेक्ट्स,प्रतिनिधी टाइम्स ग्रुप येथे-ईटी एज),विक्रांत मेहता (आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एलआयसी लिमिटेडचे राज्य प्रमुख),राहुल बागवे(काॅर्पोरेट कम्युनिकेशन्स लीडर)आदी मान्यवर उपस्थित होते.प्रेक्षक सर्व सादरीकरणाचा आनंद घेत होते आणि प्रोत्साहनही देत होते.

   पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या आणि उद्याचे जागतिक नागरिक होण्यासाठी त्यांचे भविष्य घडविण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.तसेच अध्यक्ष डाॅ.ए.एफ.पिंटो व्यवस्थापकीय संचालक डाॅ.ग्रेस पिंटो आणि संचालिका सोनल पिंटो यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी आभार व्यक्त केले.पदविदान समारंभ यशस्वी केल्याबद्दल प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडुन आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post