![]() |
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तहसीलचे तहसीलदार किशोर यादव यांच्या धाडसी कारवायांना जुने वाहन अडसर ठरत असल्याने शासनाकडून मंजूर नवीन वाहन वाटपात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहूरला 5 नोव्हेंबर रोजी नवीन वाहन दिल्याने तहसीलदारानी तब्बल 30 पेक्षा वाहने जास्त पकडून जबरी कारवायात जिल्ह्यात सर्वात जास्त जबरी कारवाया करून महसूल विभागाच्या नावलौकिकात भर पाडली असून नागरिकाकडून माहूर तहसीलदारांना नवीन वाहन दिल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांचे सह शासनाचे आभार व्यक्त होत आहेत
माहूर तालुका अति दुर्गम भागात वसलेला असून उंच सखल टेकड्यातून गेलेले मार्ग अनेक ठिकाणी कच्चे रस्ते तसेच पैनगंगा नदी किनाऱ्यावरून गेलेले कच्चे रस्ते यासह अनेक वेळा वाळू तस्करांना पकडण्यासाठी पैनगंगा नदी पात्रातील वाळू सह पाण्यात शासकीय वाहने टाकावी लागतात त्यामुळे येथे नवीन वाहने असणे गरजेचे होते अनेक ठिकाणी वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडल्याने गौण खनिज तस्कर पळून जाण्यात यशस्वी होत असल्याच्या घटना घडल्याने तहसीलदार किशोर यादव यांच्याकडून शासनाकडे नवीन वाहन मिळण्यास विनंती करण्यात आली होती त्यामुळे शासनाकडून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्फत नवीन वाहन देण्यात आले.
गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी काळात अनेक ठिकाणी तहसीलदारांना जुन्या वाहनाद्वारे जावे लागले होते या ठिकाणी सदरील वाहन नादुरुस्त झाल्याने तहसीलदारांना पुराच्या पाण्यातून तसेच चिखलातून अनेक दिवस शेत शिवारात फिरावे लागले होते वेळोवेळी जुने वाहन नादुरुस्त होत असल्याने महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तात्काळ नवीन वाहन मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि 5 नोव्हेंबर 2024 रोजी शासनाकडून वाहन पुरवठा झाल्यानंतर लगेच प्रधान्याने माहूरला नवीन वाहन दिले त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सह शासनाचे नागरिकाकडून आभार व्यक्त होत आहेत