प्रा.आ. केंद्र.अंजनसिंगी येथे डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यता प्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्राचे उद्घाटन
अंजनसिंगी : दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंजनसिंगी येथे मान्यता प्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्षिरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक सुदेवाड सर, पर्यवेक्षक दिलीप देशमुख, एसटीएस मनीष निरमुंडे, एसटीएलएस वानखडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज वरकंठे, औषध निर्माण अधिकारी मंदार गर्गे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र चंदने, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक सेविका आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यता प्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्र सुरू झाल्याने यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनसिंगी कार्यक्षेत्रातील रुग्णांची मोफत क्षयरोग (टिबी)तपासणी व उपचार अंजनसिंगी येथेच केल्या जाईल या सुविधांचा नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले. मान्यता प्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्राचे कामकाज अंजनसिंगी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री मनोज वरकंठे पाहतील.