गावाकडची बातमी|कानबाई मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

 


एरंडोल येथील कानबाई मित्र मंडळ यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मरीमाता मंदिरात कानबाई मातेच्या वह्या (भजन) गायन करून नवीन वर्षाचे स्वागत केले.



या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष भिका चौधरी आणि उपाध्यक्ष आधार माळी यांच्या प्रेरणेने ज्येष्ठ सदस्य ओंकार चौधरी, अशोक चौधरी, अजय महाजन, चिंतामण चौधरी, ईश्वर मराठे, विक्रम पांचाळ, पंकज धनगर, भगवान बडगुजर, दिलीप बडगुजर, आत्माराम पाटील, प्रल्हाद मराठे, तुषार चौधरी आदी सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमासाठी मरीमाता मंदिराचे पुजारी यशवंत बुंदेले आणि मयुर बुंदेले यांचे सहकार्य लाभले.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी 2025 हे वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना कानबाई माता आणि मरीमातेच्या चरणी केली.

कानबाई मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post