सेंट झेविअर्स स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
मूर्तिजापूर - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने शाळेच्या वतीने दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असून चिमुकल्यांनी आपल्यातील कला सादर करतांना जिवनातील ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांची उजळणी केली.
ॲकेडमिक हाईटस पब्लीक स्कूल येथे तिन दिवशीय आयोजीत कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता म्हणून ओळख असलेल्या सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून व संस्कृतीप्रमाणे मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. के जी १ मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांनी " सपनो को छु लेंगे हम " या गाण्यावर नृत्य सादर करत असतांना जिवनात यशस्वी होऊन मोठ्या पदाला गवसनी घालण्यासाठी ध्येय ठरवून लागणाऱ्या प्रयत्नांची उजळणी करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी " स्त्रीयांची गौरवगाथा " या शिर्षकाखाली नाटक सादर करत सावित्री बाई फुले, झाशीची राणी यांच्या यशस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकत आजच्या काळात सुद्धा स्त्री अनेक क्षेत्रात आघाडीवर असून माणसाच्या बरोबरीने काम करत असल्याचा प्रत्यय आणून दिला.ॲकेडमिक हाईटस पब्लीक स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत धर्माधिकारी यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपले अस्तीत्व टिकवत पुढे जाण्यासाठी वर्तमान व भविष्य काळातील विविध प्रकारच्या परिक्षांची माहीती आपल्या मनोगतातून विशद केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँक मूर्तिजापूर शाखेचे व्यवस्थापक मंगेश गवई, गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून गट समुह साधन केंद्रांचे विषय साधन व्यक्ती शिक्षक प्रविण मोहोड तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून अभियंता संकेत ताकुलवार यांच्यासह संस्थेचे संचालक अनिल दर्याणी, राम दर्याणी, रिया दर्याणी, रेणुका कांबे, मा.नगराध्यक्ष व्दारकाप्रसाद दुबे, ॲड.अविन अग्रवाल, सागर आखरे,शिवदास तिरकर, गिरिश संघवी, श्रीकांत पिंपळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संध्या दुबे यांनी केले सुत्रसंचालन रीना देशमुख तर आभार पूजा पिंपळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शुभम वानखडे, शिक्षक अक्षय भागवत इत्यांदीनी परिश्रम घेतले.