राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने प्रतिक कुऱ्हेकर सन्मानित..!
मूर्तिजापूर - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्याकडून दिला जाणारा " राष्ट्रीय कर्मयोगी " पुरस्काराने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील प्रतिक लक्ष्मणराव कुऱ्हेकर व रवी खिराडे यांना पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी तसेच उत्कृष्ट लेखणीतून केलेल्या कार्या बद्दल सन्मानित करण्यात आले.
मूर्तिजापूर येथील प्रतिक कुऱ्हेकर यांनी सामाजिक, धार्मिक,आरोग्य,शासकीय विभाग तसेच विविध विषयांवर आपल्या लेखणीतून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल घेऊन प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या नाशिक या कुंभ नगरीत आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने सण २०२४-२५ चा "राष्ट्रीय कर्मयोगी " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गाव सहेली |
नाशिक येथील होरायझन अकॅडमी सी. बी. एस. सी स्कूलच्या सभागृहात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला झी २४ तास चे संपादक कमलेश सुतार, भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते तथा संपादक अजित चव्हाण, कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण खासदार राजाभाऊ वाजे,मिसेस मलेशिया ज्योती केदारे -शिंदे, पत्रकार संस्थाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला.