निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे हस्ते दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन...!

 


भडगांव : शेतकरी सहकारी संघ संचलिका मा. नगरसेविका योजनाताई पाटील यांचे नववर्ष २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे हस्ते भडगांव शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाले. 


  प्रकाशन प्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांनी नूतनवर्ष सर्वाना सुख समृद्धी, यश प्रगती व आरोग्यदायी जावो या शुभेच्छा दिल्या. तसेच योजना पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सदर प्रसंगी मा. नगरसेवक मनोहर चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक गोरख पाटील, वंदे मातरम् प्रतिष्ठान अध्यक्ष विजय साळुंखे, युवासेना ता. प्रमुख चेतन पाटील, शहर प्रमुख चेतन पाटील, संघटक जिभाऊ महाजन, महीला जि. उपप्रमुख पुष्पा परदेशी, ता. उपप्रमुख गायत्री बिरारी, शहर उपप्रमुख सुरेखा वाघ, संघटक सोनाली चौधरी, समन्वयक योगेश पाटील, विश्वनाथ पाटील, उपप्रमुख पृथ्वीराज पाटील, शहर संघटक रोनित अहिरे, ता. संघटक भैय्या राजपूत, शहर उपप्रमुख यश बिरारी, संघटक रितेश महाजन, नवल राजपूत, सत्यजित पाटील, संकेत सोमवंशी, हेमंत पाटील आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post